Video Call वरुन धनंजय मुंडेंची उपस्थिती, लॉकडाऊनचे नियम पाळत लग्न केलेल्या 75 जोडप्यांना आर्थिक मदत

| Updated on: May 31, 2021 | 1:21 PM

कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम पाळून विवाह संपन्न करणाऱ्या तब्बल 75 कुटुंबांना बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मदत केली. (Dhananjay Munde newly wed couples )

Video Call वरुन धनंजय मुंडेंची उपस्थिती, लॉकडाऊनचे नियम पाळत लग्न केलेल्या 75 जोडप्यांना आर्थिक मदत
धनंजय मुंडे यांची व्हर्चुअल उपस्थिती (मुंडे यांचा प्रातिनिधीक फोटो)
Follow us on

परळी : बीड जिल्ह्यातील परळीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विवाह संपन्न करणाऱ्या तब्बल 75 कुटुंबांना पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मदतीचा हात दिला. नवदाम्पत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत धनंजय मुंडे यांनी केली आहे. (Dhananjay Munde financial help to 75 newly wed couples in Beed Parali)

सामूहिक विवाह सोहळ्याला काट

परळीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. मात्र यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाची लाट असल्यामुळे सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला नाही. अशात कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम पाळून विवाह संपन्न करणाऱ्या तब्बल 75 कुटुंबांना बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मदत केली.

परळी मतदारसंघात सेवाधर्म संकल्प

75 जोडप्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत धनंजय मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात सेवाधर्म संकल्प सुरु केला आहे. त्याच अनुषंगाने रुग्णांच्या मदतीसह विवाह संपन्न करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे.

व्हिडीओ कॉलवरुन धनंजय मुंडेंची उपस्थिती

धनंजय मुंडे सध्या मुंबईत आहेत. व्हिडीओ कॉलवर संपर्क करून गटनेते वाल्मिक कराड यांनी त्यांच्या वतीने जोडप्यांना धनादेशाचे वाटप केले. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्हिडीओ कॉलवरून मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद देखील साधला.

मुंडेंचे नेतृत्व, नव्या योजना आणि 2003 नंतर पहिल्यांदाच 100%कोटा पूर्ण

दरम्यान, सामाजिक न्याय विभागांतर्गत लाभार्थी असणाऱ्या सर्वच योजना थेट वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या असल्याने, हा विभाग नेहमी चर्चेत असतो. धनंजय मुंडे यांनी ‘महाशरद’ सारखा डिजिटल प्लॅटफॉर्म, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास बळकटी, ऑनलाईन जात पडताळणी अशा अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या. ऊसतोड कामगार महामंडळाच्या निधीचा तर सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य निधीतून एक रुपयाही न विभागला जाऊ देता, मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून निधी उपलब्धीचा प्रश्न कायमचा सोडवला आहे.

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी

(Dhananjay Munde financial help to 75 newly wed couples in Beed Parali)