अजित पवारांच्या धमकीला घाबरु नका, तुमची जबाबदारी माझ्यावर : शरद पवार

| Updated on: Nov 25, 2019 | 8:24 PM

अजित पवारांना व्हिप काढण्याचा कोणाताही अधिकार नाही. ज्यांना पद जाईल असा धोका वाटत आहे. त्यांनी काळजी करु नये. त्यांची जबाबदारी मी स्व:त घेतो असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad pawar criticizes ajit pawar) केले.

अजित पवारांच्या धमकीला घाबरु नका, तुमची जबाबदारी माझ्यावर : शरद पवार
Follow us on

मुंबई : “उपमुख्यमंत्री अजित पवारांना व्हिप काढण्याचा कोणाताही अधिकार नाही. ज्यांना पद जाईल असा धोका वाटत आहे. त्यांनी काळजी करु नये. त्यांची जबाबदारी मी स्व:त घेतो,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad pawar criticizes ajit pawar) केले.

“अनेक आमदारांना भीती दाखवली जात आहे. अजित पवार व्हिप काढून बाजूने वळवतील. पण ज्यांना पक्षाने पदावरुन हटवलं आहे. त्यांना व्हिप काढण्याचा कोणताही अधिकार नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच ज्यांना पद जाईल असा धोका वाटतो त्यांनी काळजी करु नये त्यांची जबाबदारी मी स्वत: घेतो,” असेही शरद पवार (Sharad pawar criticizes ajit pawar) म्हणाले.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकूण 162 आमदारांचे एकत्र फोटो सेशन आणि ओळख परेडचा कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून एकजूट दाखवली जात आहे. यावेळी जमलेल्या सर्व आमदारांना एकनिष्ठेतेची शपथ दिली (Sharad pawar criticizes ajit pawar) गेली.

“अजित पवारांनी सर्वांची दिशाभूल केली. मात्र अजित पावर आता कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही लवकरच अजित पवारांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचेही शरद पवार म्हणाले.”

“भाजपकडून संसदीय नियम तोडले जात आहे. हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. अयोग्य काही लादलं तर महाराष्ट्र धडा शिकवेन असे शरद पवार म्हणाले. अवैध पद्धतीनं सत्तेवर आलेल्यांना बाजूला करु.” असेही शरद पवार यावेळी (Sharad pawar criticizes ajit pawar) म्हणाले.

“सदस्यत्व जाण्याची भीती बाळगू नका. तुमची वैयक्तिक जबाबदारी माझी आहे. व्हिपचा अधिकार पक्षातून बाजूला काढणाऱ्याला नाही असेही ते म्हणाले. नव्या सदस्यांनी भिती दाखवली जात आहे. ज्यांना पक्षाने बाजूला ठेवलं आहे त्यांना कुठलाच अधिकार नाही. आम्ही घटनातज्ज्ञांकडून याबाबत माहिती घेतली आहे,” असेही शरद पवार म्हणाले

… त्यांना कुठलाच अधिकार नाही : शरद पवार

सुप्रीम कोर्टानं बहुमत सिद्ध करायला सांगितलं की करु. नवीन सदस्यांच्या मनात संशय निर्माण केला जातोय. केंद्रातील लोकांनी अनेक राज्यात चुकीचे केले आहे, आम्ही घटनातज्ञाकडून माहिती घेतलेली आहे. ज्यांना पक्षानं बाजूला ठेवलं त्यांना कुठलाच अधिकार नाही, असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रात सरकार स्थापनेची जबाबदारी आमची : शरद पवार

बहुमत नसताना एक सरकार (भाजप) सत्तेवर आलं आहे. बहुमत नसतानाही अनेक राज्यात सत्ता स्थापन केली. पण महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे आमची जबाबदारी आहे, ज्यांच्याकडे बहुमत ते इथं आहेत. आणखी काहींचा संपर्क आहे. आता महाराष्ट्राची वेळ आली आहे, असं शरद पवार म्हणाले.

सांताक्रुझच्या ग्रँड हयात हॉटेलच्या तळमजल्यावरील बॉल रुममध्ये हे फोटो सेशन पार पडलं. यावेळी ओळख परेडही झाले. संध्याकाळी 7 च्या दरम्यान ही ओळख परेड पार पडली. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी “आम्ही सर्व एक आहोत आणि एकत्र आहोत. आमच्या 162 आमदारांना या आणि एकत्र बघा,” असे ट्विट केले होते. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी हे ट्विट राज्यपालांना टॅग केले आहे.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे ग्रँड हयातमध्ये उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे ग्रँड हयातमध्ये उपस्थित होते. त्याशिवाय काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, मल्लिकाअर्जुन खर्गे हयातमध्ये उपस्थित होते.