मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिलं, म्हणून माझी ही अवस्था : खडसे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

जळगाव : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिल्यानेच माझी ही अवस्था झाली आहे, अशी खदखद माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. जळगावात मुस्लीम समाजाकडून आयोजित ‘एक शाम नाथाभाऊ के नाम’ या मुशायराच्या कार्यक्रमावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. खडसे नेमकं काय म्हणाले? “मंत्रिपदाचं काय, येतात […]

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिलं, म्हणून माझी ही अवस्था : खडसे
Follow us on

जळगाव : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिल्यानेच माझी ही अवस्था झाली आहे, अशी खदखद माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. जळगावात मुस्लीम समाजाकडून आयोजित ‘एक शाम नाथाभाऊ के नाम’ या मुशायराच्या कार्यक्रमावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.

खडसे नेमकं काय म्हणाले?

“मंत्रिपदाचं काय, येतात आणि जात असतात. 40 वर्षांच्या काळात आपण अनेक मंत्रिपद भूषवली.”, असे एकनाथ खडसे सांगत असतानाच, “पुढील काळात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं” अशी इच्छा एका मुस्लिम कार्यकर्त्याने व्यक्त केली. यावर उत्तर देताना, “मुख्यमंत्रीही होऊ, मात्र मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिल्यामुळेच आपण कोणताही गुन्हा केलेला नसताना आपली अशी अवस्था झाली.”, असे सांगत एकनाथ खडेस यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

“मंत्रिपदावर असताना जाती-धर्माच्या आधारावर नव्हे, तर मुस्लिम समाज मागास असल्याने सामाजिक भावनेतून आपण नेहमीच मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला.”, असे सांगताना खडसे पुढे म्हणाले, “मंत्रिपदावर असताना मुस्लिम वख्त बोर्डाच्या महागड्या जमिनी ताब्यात घेत असताना, त्यातील एका जमिनीवरील इमारत पाडण्याची नोटीस दिली होती, ती जमीन अंबानींची निघाली. यावेळी केलेली कारवाई आमच्याकडे काही जणांना आवडली नाही. त्यावेळी मोठा दबावही आला होता. मात्र सामाजिक भावनेतून आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला होता.”

VIDEO : एकनाख खडसे नेमकं काय म्हणाले?