Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधान परिषद निकालानंतर नाराज असल्याची चर्चा! मतं फुटल्याचा परिणाम?

| Updated on: Jun 21, 2022 | 8:07 AM

शिवसेना आमदारांच्या फुटीमुळे शिवसेनेत नाराजी नाट्य असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधान परिषद निकालानंतर नाराज असल्याची चर्चा! मतं फुटल्याचा परिणाम?
एकनाथ शिंदे यांचा शिवसेना नेत्यांशी संपर्क, चर्चेसाठी तयार, वरिष्ठ नेत्याला सुरतला बोलवलं
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : विधान परिषद (Maharashtra Vidhan Parishad) निकालानंतर आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणुकीच्या निकालापासून नॉच रिचेबल आहे. ते सोमवार संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे आजच्या शिवसेनेच्या (Shivsena) बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेना आमदारांच्या फुटीमुळे शिवसेनेत नाराजी नाट्य असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार देखील नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच काही आमदार त्यांच्यासोबत असल्याने आज शिवसेनेकडून दुपारी बारा वाजता एक बैठक ठेवण्यात आली आहे. तसेच शिंदेनी टोकाची भूमिका घेतल्याची देखील माहिती मिळत आहे.

शिवसेनेच्या बैठकीला हजर राहणार का ?

काल दिसभरात एकनाथ शिंदे कुठेही अधिक वावरताना दिसले नव्हते. तसेच भाजपकडून नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे काल ते माध्यमांना अधिक प्रतिक्रिया देखील देताना दिसले नाहीत. काल विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ते नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. पण काल रात्रीपासून त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल असल्यामुळे आज शिवसेनेच्या बैठकीला हजर राहणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांचं फोन बंद असणं हे महाविकास आघाडीला महागात पडू शकतं असं म्हटलं जातंय.

कॉंग्रेसला मतदान करण्यावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी होती

एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याची माहिती समजली आहे. आज शिवसेनेची बैठक दुपारी बोलावण्यात आली आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे हजर राहणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसला मतदान करण्यावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे असं म्हटलं जात होतं. काल झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले. त्यानंतर काही शिवसेनेची मतं फुटली असल्याची चर्चा होती.

हे सुद्धा वाचा

काही वेळात ते तुमच्या संपर्कात असतील – नीलम गोऱ्हे

आम्ही त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यावरती अनेक जबाबदाऱ्या आहत. त्यामुळे ते काही वेळात आपल्या संपर्कात असतील. थोडीफार नाराजी होत असते. काल झालेल्या निवडणुकीत आमचे दोन्ही आमदार निवडून आले आहेत. कालच्या निवडणुकीत ते होते, तसेच उद्धव ठाकरेंच्या जीवाला जीव लावून त्यांनी काम देखील केलं आहे.

काहीवेळात त्याबाबत स्पष्टता होईल, तोपर्यंत उगाचं हवेतल्या बातम्या कुणीही पसरवू नये असं निलम गोऱ्हे यांनी सांगितलं.