Video : ‘…त्यांना लागणारा सगळा खर्च मी करतो, वारकऱ्यांचा जीव महत्त्वाचाय’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना फोनवरुन निर्देश

| Updated on: Jul 07, 2022 | 9:07 AM

Eknath Shinde Video : वारकऱ्यांच्या दिंडीत एक भरधाव पिक अप वाहन घुसलं. या भीषण अपघातामध्ये 14 वारकरी जखमी झाले.

Video : ...त्यांना लागणारा सगळा खर्च मी करतो, वारकऱ्यांचा जीव महत्त्वाचाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना फोनवरुन निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : सांगलीमध्ये (Sangli Accident News) झालेल्या वारकऱ्यांच्या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde News) यांनी फोनवरुन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वारकऱ्यांची जीव महत्त्वाचाय, त्यांना लागणारा सगळा खर्च मी करतो, गरज वाटली तर तुम्ही त्यांना मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करा, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी जखमी वारकऱ्यांना मदतीचा हात दिलाय. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी फोनवरुन संपर्क साधत कोणतीही गरज लागली मला सांगा, असा म्हणत आश्वस्त केलं. सांगलीतील मिरज पंढरपूर (Miraj Pandharpur Highway) हायवेवर एक भीषण अपघात झाला. वारीसाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत एक भरधाव पिक अप वाहन घुसलं. या भीषण अपघातामध्ये 14 वारकरी जखमी झाले होते. या वारकऱ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींना मिरज सिव्हिर आणि कवठे महांकाळ इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे यांनी जातीने वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि जखमींच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

‘आपले वारकरी आहेत ना ते सगळे, त्यांनी कुठलंही काही कमी पडू देऊ नका, त्यांना उत्तमातली उत्तम ट्रिटमेन्ट द्या. तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला वाटलं तर त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं आहे, तर न्या. पैशांची बिलकुल काळजी करु नका. त्यांचा जीव महत्त्वाचाय. काही लागलं तरी मला सांगा’, असं म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केलंय.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

वारकऱ्यांच्या अपघाताबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांच्याशी त्यांनी यावेळी बातचीत केली.

कोल्हापीर जिल्ह्यातील शाहूवाडीहून हे सर्व वारकरी पायी दिंडी काढत पंढरपूरच्या दिशेनं निघाले होते. कवठेमहांकाळ तालुक्यातल नॅशनल हायवे केरेवाडी इथं या वारकऱ्यांच्या पायी दिंडी एका भरधाव पिक व्हॅनने चिरडलं.

दिंडीत असणाऱ्या एका छोट्या टेम्पोलाही या वाहनाने जोरदार धडक दिली. त्यानंतर पायी चालत असलेल्या वारकऱ्यांना ठोकर देत गाडी पलटी झाली. सध्या या अपघातातील जखमी वारकऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.