एकनाथ शिंदे गट आणि राज ठाकरेंच्या मनसेची युती होणार?

| Updated on: Sep 06, 2022 | 5:57 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनाला गेले होते.  त्यामुळे शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलय. आणि शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा संदर्भात मनसेने त्यांनी सूचक विधान केले युतीचा निर्णय राज ठाकरे घेतील अशी माहिती मनसे नेते  देत आहेत.

एकनाथ शिंदे गट आणि राज ठाकरेंच्या मनसेची युती होणार?
Follow us on

मुंबई : जे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन दाखवलंय असचं म्हणण्याची वेळ आलेय. मनसे आणि शिंदे गटात युती होणार असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गट एकत्र येण्याची चर्चा आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबत(Raj Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि भाजपची जवळीक वाढत असल्याने नव्या युतीच्या चर्चेला उधाण आलय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनाला गेले होते.  त्यामुळे शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलय. आणि शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा संदर्भात मनसेने त्यांनी सूचक विधान केले युतीचा निर्णय राज ठाकरे घेतील अशी माहिती मनसे नेते  देत आहेत.

हिंदुत्वावरून मन एकत्र असतील तर गैर काय ? असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी उपस्थित केला आहे. मनसे – शिंदे गटाचा युतीचा निर्णय अजून झालेला नाही असेही किरण पावसकर यांनी सांगीतले. मुंबई महापालिकेत युती होणार का ? हे आता तरी सांगण कठीणं असल्याचेही किरण पावसकर म्हणाले. युती बाबात अजून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राज्यात भाजप आणि मनसे युतीची चर्चा सुरु आहे. त्यातच आता शिंदे गट आणि मनसे युतीची चर्चा रंगली आहे.  उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला तोडीस तोड देण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. यासाठीस शिंदे गटाने देखील दसरा मेळाव्याचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मनसे राज ठाकरे (Raj Thackeray ) प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मनसे यांनी प्रमुख पाहुणे उपस्थित रहावे याकरिता शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे.

हिंदुत्वाचा विचार घेवूनच या ठिकाणी दसरा मेळावा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्यासारखा हिंदुत्वाचा विचार करणारा नेता या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाऊ शकते, असे संकेत शिंदे गटाकडून देण्यात आले आहेत.