काही लोक आता बांधावर जातात जाऊ द्या, मी सर्वांना कामाला लावलं; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला

| Updated on: Oct 29, 2022 | 3:11 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काही लोक आता बांधावर जातात जाऊ द्या, मी सर्वांना कामाला लावलं; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नंदुरबारमध्ये बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून एकनाथ शिंदे यांनी त्यांना नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. काही लोक बांधावर जातात जाऊ द्या, मी सगळ्यांना कामाला लावलं असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्य सरकारने किती विकास कामे केली याबाबत देखील त्यांनी माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

आम्ही सत्तेत येण्यापूर्वी विकासाची गती मंदावली होती. सत्ता येताच विकासाला चालना दिली. तीन महिन्यांपूर्वी जनतेच्या मनातील सरकार आलं. आमचं सरकार आल्यानंतर पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले. सरकारकडून विकासाला गती देण्याचं काम झालं. गेल्या तीन महिन्यांमध्ये आम्ही अनेक मोठे निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही शेतकरी हाच केंद्रबींदू माणून काम करत आहोत. आतापर्यंत आम्ही नुकसानग्रस्तांना 6 हजार कोटींची मदत दिली.

हे सुद्धा वाचा

नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा

दरम्यान सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न चांगलाच तापला आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी याच आठवड्यात औरंगाबादचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पहाणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून एकनाथ शिंदे यांनी त्यांना नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. काही लोक बांधावर जातात जाऊद्या, मी सगळ्यांना कामाला लावलं असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.