Shiv sena : ठाणेकर शिंदे विरुद्ध मुंबईकर ठाकरे! बंडाच्या तिसरा दिवशी घडलेल्या 3 मोठ्या घडामोडी, जाणून घ्या

| Updated on: Jun 23, 2022 | 8:54 AM

Eknath Shinde News : गेल्या वर्षभरापासून एकनाथ शिंदेंच्या खात्यातील कामावर ठाकरेंनी स्टे आणला होता? बंडाचं मूळ कारण हेच?

Shiv sena : ठाणेकर शिंदे विरुद्ध मुंबईकर ठाकरे! बंडाच्या तिसरा दिवशी घडलेल्या 3 मोठ्या घडामोडी, जाणून घ्या
बंडाचा तिसरा दिवस
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडाचा आजचा तिसरा दिवस आहे. शिंदेंनी केलेलं बंड हे आतापर्यंतच शिवसेनेतलं (Shiv sena Political Crisis) सगळ्यात मोठं बंड ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंडाच्या तिसऱ्या दिवशी मुंबईसह गुवाहाटीमध्येही घडामोडींना वेग आला आहे. महत्त्वाच्या तीन घडामोडी बंडाच्या तिसऱ्या दिवशी समोर आल्या आहेत. पहिली घडामोड मुंबईच्या सेंट रेगिस हॉटेलमधली आहे, तर दुसरी आहे, सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये असलेल्या शिवसनेच्या आमदारांबाबतची. तर तिसरी घडामोड आहे, एकनाथ शिंदेच्या गटातून आश्चर्यकारकरीत्या परतलेल्या नितीन देशमुखांसंदर्भातली. सध्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाने फक्त शिवसेनाच नाही, तर महाविकास आघाडीनेही (Mahavikas Aghadi) धसका घेतलेलाय. तर शिवसेनेच्या बंडाचा आणि आमचा कोणताही संबंध नाही, अशा प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून समोर येत आहेत.

बंडाच्या तिसऱ्या दिवशी घडलेल्या तीन मोठ्या घडामोडी..

  1. पहिली घडामोड : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सेंट रेगिसमध्ये मुंबीतील शिवेसना आमदारांना हलवण्यात आलं होतं. या आमदारांची सकाळी बैठक होणार आहे. सकाळी 11.30 वाजता आमदारांची बैठक पार पडेल. दरम्यान, शिवसेना आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी गटनेतेपदी नेमणूक केलेले अजय चौधरी ठाण मांडून होते. आता आज होणाऱ्या बैठकीत नेमकं काय होतं, हे पाहणं महत्त्वाचंय.
  2. दुसरी घडामोड : शिवसेनेचे खंदे समर्थक सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झालेत की काय? अशीही शंका घेतली जातेय. सध्या सरवणकर आणि कुडाळकर हे नॉट रिचेबल असल्यानं संशय व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे आणखी तीन आमदारांची भर एकनाथ शिंदे गटात पडली आहे. बंडाच्या तिसऱ्या दिवशी शिंदेंची ताकद अधिक वाढली, असल्याचं बोललं जातंय. दादा भुसे, संजय राठोड, दीपक केसरकर, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे हे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अधिकच खळबळ माजलीय.
  3. तिसरी घडामोड : दरम्यान, बंडाच्या तिसऱ्या दिवशाची तिसरी मोठी घडामोड आहे, नितीन देशमुखांबाबतची. एकनाथ शिंदे गटातून परतलेल्या नितीन देशमुख हे आज सकाळी मुंबईत दाखल झालेत. ते आज मुंबई मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यताय. आम्ही शिवसेनेत होतो आणि नेहमी राहू, असंही ते म्हणालेत. तसंच शिवसैनिकांच्या भरवशावर निवडून आलेले सर्व आमदार परत येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

वाचा लाईव्ह अपडेट्स :

Eknath Shinde News, Uddhav Thackeray LIVE : शिवसेनेचे आणखी 3 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल, हॉटेलची सुरक्षा वाढवली

हे सुद्धा वाचा