Eknath Shinde : एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री, आज एकट्या शिंदेंचाच होणार शपथविधी, फडवणवीसांचा रोल काय?

| Updated on: Jun 30, 2022 | 4:57 PM

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलीय. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील आणि आज संध्याकाळी त्यांचा एकट्याचाच शपथविधी होईल अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री, आज एकट्या शिंदेंचाच होणार शपथविधी, फडवणवीसांचा रोल काय?
एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणीस यांची घोषणा
Follow us on

मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केलीय. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील आणि आज संध्याकाळी त्यांचा एकट्याचाच शपथविधी होईल अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सरकार (Maharashtra Government) चालेल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. तसंत शिंदे यांचा आज संध्याकाळीच शपथविधी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘उद्धवजींनी शेवटपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीचीच कास धरली’

पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की,  शिवसेनेच्या आमदारांची कुचंबना झाली. शिंदे हे शिवसेनेचे नेते. आमच्या मतदारसंघात हारलेल्या विरोधकांना निधी दिला जात असेल तर कशाच्या भरवश्यावर लढायचं असा विषय झाल्यानंतर या सर्वांनी निर्णय घेतला. की युती तोडायची. ज्या युती सोबत निवडून आलो. ती आघाडी तोडा. त्यासोबत राहायला तयार नाही, दुर्देवाने उद्धवजींनी या आमदारांच्या ऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अधिक प्राधान्य दिले. त्यांचीच शेवटपर्यंत कास धरली. हा त्यांचा प्रश्न. त्यावर बोलणार नाही. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज आहे. सरकार पडलं तर आम्ही पर्यायी सराकर देऊ लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही. असं मी वारंवार सांगत होतो.

एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री

शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष आमदार एकत्रं आले आहेत. अजून काही लोक येत आहेत. या सर्वांचं पत्रं आम्हाी राज्यपालांना दिलं. आण्ही सत्तेच्या पाठिमाग नाही. मुखय्मंत्रीपदासाठी आण्ही चालत नाही.ही तत्तवाची लढाई. हिंदुत्वाची लढाई आहे. विचाराची लढाई. शिंदेंना भाजप पाठिंबा देईल आणि शिंदे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज साडे सात वाजता शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. एकट्याचाच शपथ विधी होईल. नंतर आम्ही विस्तार करू. त्यात शिवसेनेचे शिंदेंसोबत असलेलेल भाजपचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील.

‘मी बाहेर असेल, पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी’

मी बाहेर असेल. पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचं आणि बाळसााहेबांनी मांडलेलं हिंदुत्व. भाजप हिंदुत्व मांडतय. मोदींनी जे व्हिजन दाखवलं ते पुढे नेणार. काम करेल, असं फडणवीस यांनी जाहीर केलंय.