Electricity bill | महावितरण ग्राहक आहे, मनसेने वीज बिल माफ करण्याबाबत केंद्राला विचारावे : नितीन राऊत

| Updated on: Aug 11, 2020 | 4:29 PM

जर मनसेने तोडफोड केली असेल, तर त्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे नितीन राऊत (Nitin Raut On MNS Agitation Lockdown Electricity bill) म्हणाले.

Electricity bill | महावितरण ग्राहक आहे, मनसेने वीज बिल माफ करण्याबाबत केंद्राला विचारावे : नितीन राऊत
Follow us on

मुंबई : लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव विज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महावितरण हे फक्त ग्राहक आहे. त्यामुळे मनसेने वीज बिल माफ करण्याबाबत केंद्राला विचारावे, अशी प्रतिक्रिया राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. तसेच केंद्राला 10 हजार कोटी डिस्कोमला अनुदान स्वरूपात द्या, अशी विनंती केली होती. मात्र केंद्राने आमची मागणी धुडकावून लावली आहे, असेही नितीन राऊतांनी यावेळी सांगितले. (Nitin Raut On MNS Agitation Lockdown Electricity bill)

“वीज बिल वाढलेली नाही. जवळपास 62 ते 65 टक्के लोकांनी त्यांची वीज बिल भरलं आहे. जर मनसेला वीज बिल माफ करावे हे अपेक्षित असेल तर त्यांनी केंद्र सरकारला विचारावं. महावितरण ग्राहक आहे. ते कोळसा विकत घेतं. जनरेशन कंपनीकडून वीज घेते. कर्ज घेते, त्यामुळे आमच्यावर घेतलेला आक्षेप आहे,” असे नितीन राऊत म्हणाले.

“लोकांची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. राज्य सरकार वीज बिलाबाबत निर्णय घेईल. उद्या कॅबिनेटची बैठक आहे. त्यामुळे काही प्रस्ताव येईल का, याची आम्ही वाट बघत आहोत,” असेही नितीन राऊतांनी यावेळी सांगितले. (Nitin Raut On MNS Agitation Lockdown Electricity bill)

“केंद्र सरकार कोरोना काळात व्यापार करत असेल. व्याज दर आकारात असेल, तर केंद्राला 10 हजार कोटी डिस्कोमला अनुदान स्वरूपात द्या, अशी विनंती केली होती. मात्र केंद्राने आमची मागणी धुडकावून लावली आहे. उद्या कॅबिनेट महत्वपूर्ण निर्णय होईल, असे नितीन राऊत म्हणाले.

मनसेचं पुण्यात आंदोलन

लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव विज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याप्रकरणी आज मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील महावितरणाच्या कार्यालयात खळळखट्याक आंदोलन करत तोडफोड केली. यावर नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया देत कारवाईचा इशारा दिला. जर मनसेने तोडफोड केली असेल, तर त्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. कोणत्याही शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं तर कारवाई होते, असे नितीन राऊत म्हणाले.

घराचं वीज बिल 40 हजार, नागपुरात व्यक्तीची आत्महत्या

नागपूरमध्ये लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचं वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

लीलाधर गायधने असं या व्यक्तीचं नाव आहे. वारंवार MSEB च्या कार्यालयात हेलपाटे मारुनही दिलासा न मिळाल्याने गायधने यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. लीलाधर गायधने हे एका खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. (Nitin Raut On MNS Agitation Lockdown Electricity bill)

संबंधित बातम्या : 

Electricity Bill | लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले, सरकार आता तरी जागे होईल का? : फडणवीस

Electricity Bill | घराचं वीज बिल 40 हजार, MSEB च्या फेऱ्या मारुनही कपात नाही, जाळून घेत आत्महत्या