शेतकरी, मजूर ते थेट पहिला पारधी सरपंच, उस्मानाबादमधील संताजी पवार कोण?

| Updated on: Jan 22, 2021 | 4:42 PM

उस्मानाबाद शहराच्या शेजारील सांजा या गावचा सरपंच होण्याचा मान पारधी समाजातील संताजी पवार यांना मिळालाय

शेतकरी, मजूर ते थेट पहिला पारधी सरपंच, उस्मानाबादमधील संताजी पवार कोण?
Follow us on

उस्मानाबाद : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असल्या तरी अजूनही सरपंच पदासाठीची रस्सीखेच सुरुच आहे. आज (22 जानेवारी) उस्मानाबाद जिल्ह्यातील 622 ग्रामपंचायतमधील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली. उस्मानाबाद शहराच्या शेजारील सांजा या गावचा सरपंच होण्याचा मान पारधी समाजातील संताजी पवार यांना मिळालाय (First Paradhi community Sarpanch of Osmanabad Santaji Pawar).

संताजी पवार शिवसेनेते कार्यकर्ते असून ते महाविकास आघाडीचे सरपंच असणार आहेत. सांजा या गावातील 15 पैकी 12 जागा महाविकास आघाडीच्या जोगेश्वरी विकास पॅनेलला मिळाल्या होत्या. त्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे डोळे लागले होते. अखेर संताजी पवार यांच्या वाट्याला हे पद आलं.

7 वी पास असलेले संताजी पवार अगोदर शेतात काम करत होते. त्यानंतर त्यांनी मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली. यंदा पहिल्यांदाच त्यांनी गावची ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयीही झाले. विशेष म्हणजे आरक्षण सोडतीनंतर सरपंचपदाचाही मान त्यांनाच मिळालाय.

संताजी पवार यांनी शेतकरी, मजूर ते थेट गावाचा सरपंच असा प्रवास केलाय. हा प्रवास सशक्त लोकशाहीमुळे पूर्णत्वास गेल्याची भावना दे व्यक्त करत आहेत. उस्मानाबाद नगर परिषदेचे शिवसेनेचे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदू राजे निंबाळकर यांनी नूतन सरपंच पवार यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

भविष्यात वीज, पाणी, रस्ते, नाली कामे करण्याचा पवार यांचा मानस आहे. स्वार्थासाठी काही न करता गावची विकास कामे करणार असा त्यांचा संकल्प आहे. गावात मतभेद न करता एकत्र येऊन विकासावर भर देण्याचा संकल्प त्यांनी केलाय.

हेही वाचा :

कोणत्या पक्षाकडे किती ग्रामपंचायती; स्थानिक आघाड्या करणार का चमत्कार?

ग्रामपंचायत निकालाची बात न्यारी, गावकऱ्यांकडून विजयी लेकीची थेट घोड्यावरुन मिरवणूक

जयंत पाटील म्हणतात, ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी अव्वल, काँग्रेस चौथी!

व्हिडीओ पाहा :

First Paradhi community Sarpanch of Osmanabad Santaji Pawar