AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे सरकारमध्ये पहिली महिला मंत्री, राष्ट्रवादीच्या या महिला नेत्याने घेतली शपथ

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी फुटली असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

शिंदे सरकारमध्ये पहिली महिला मंत्री, राष्ट्रवादीच्या या महिला नेत्याने घेतली शपथ
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jul 02, 2023 | 3:26 PM
Share

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत ( NCP ) मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह अनेक आमदार शिवसेना-भाजप ( Shivsena-BJP-NCP ) युतीत सहभागी झाले आहेत. अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी ( NCP MLA ) शपथ घेतली आहे. यासह शिंदे सरकारमध्ये पहिल्या महिला मंत्र्याचा समावेश झाला आहे. अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

शिंदे सरकारमध्ये पहिली महिला मंत्री

अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे शिंदे सरकारमध्ये आता पहिल्या महिला मंत्र्याचा समावेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाले आहे.

शरद पवार यांना मोठा झटका

अजित पवार हे फुटल्यामुळे आता राष्ट्रवादी संकटात आहे. राष्ट्रवादीत २ गट झाले आहे. अजित पवार यांच्यासह अनेक आमदार आज शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माझा या शपथविधीला पाठिंबा नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार आता काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अजित पवार उपमुख्यमंत्री

अजितदादांच्या सोशल मिडीयावर उपमुख्यमंत्री असं पद अपडेट झालं आहे. ट्विटर, फेसबुकवर अजितदादांकडून उपमुख्यमंत्रीपदाचा उल्लेख करण्यात आला आहे.  माजी विरोधी पक्षनेते असाही उल्लेख त्यामध्ये करण्यात आला आहे.

‘ऑपरेशन लोटस’

आजचा शपथ विधी हा ऑपरेशन लोटसचा भाग या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत पाठींबा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी पवार साहेबांसोबत आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

बारामतीमध्ये जल्लोष

बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु झाला आहे. अजितदादांच्या शपथविधीनंतर बारामती शहरात कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. शहरातील भिगवण चौकात फटाके वाजवत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत