वाढदिवशी चाहत्याचं रक्ताने पत्र, उदयनराजेंना मंत्रिपद द्या, अमित शाहांकडे मागणी

| Updated on: Feb 10, 2020 | 10:26 PM

माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रिपद द्या अशी मागणी एका चाहत्याने रक्ताने पत्र लिहून केली (udayanraje bhosale follower letter to amit shah) आहे.

वाढदिवशी चाहत्याचं रक्ताने पत्र, उदयनराजेंना मंत्रिपद द्या, अमित शाहांकडे मागणी
Follow us on

सातारा : माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रिपद द्या, अशी मागणी एका चाहत्याने रक्ताने पत्र लिहून केली (udayanraje bhosale follower letter to amit shah) आहे. निलेश जाधव असे या चाहत्याचे नाव आहे. या तरुणाने गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून उदयनराजेंना मंत्रिपद द्या अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे आज (10 फेब्रुवारी) निलेशचा वाढदिवसही आहे.

“मी निलेश सुर्यकांत जाधव सांगू इच्छितो की, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (महाराज साहेब) यांना राज्यसभेवर खासदार करुन मंत्रीपद मिळावे आणि छत्रपतींच्या गादीचा सन्मान करावा अशी विनंती करतो,” असे  निलेशने या पत्रात लिहिले आहे. गृहमंत्री अमित शाह यांना त्याने हे लिहिले आहे.

निलेशचा आज वाढदिवस असून वाढदिवसानिमित्ताने त्याने अमित शाहांना रक्ताने हे पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने उदयनराजेंना मंत्रीपद द्यावे अशीही मागणी केली (udayanraje bhosale follower letter to amit shah) आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील संसद भवनात अमित शाहांची भेट घेतली होती. त्यावेळी या दोघांच्या भेटीत महाराष्ट्रातील सात राज्यसभेच्या जागेवर चर्चा करण्यात आली होती. त्यात उदयनराजे भोसले यांच्या नावावर शाह आणि फडणवीस यांची सहमती दर्शवल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

यामुळे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या हालचालींना सुरुवात झाल्याची चर्चा रंगली आहे. मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागांची मुदत संपणार आहे. यावेळी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत (udayanraje bhosale follower letter to amit shah) नाही.