
मुंबई: अनेक जण सर्रासपणे वाहतूक नियम (Traffic rules) धाब्यावर बसून प्रवास करताना दिसतात. वाहतूक नियमांचे अनेकदा उल्लंघन होते. मात्र मुंबईच्या (mumbai) रस्त्यावर आज एक वेगळच चित्र पहायला मिळालं. हे चित्र मोठे अश्वासक होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) मुंबईच्या रस्त्यावरून प्रवास करताना ‘टीव्ही 9’ च्या कॅमेऱ्यात कैद झाले. मंत्रीपदाचा कुठलाही बडेजावपणा न करता ते सर्व वाहतूक नियमांचे पालन करत प्रवास करत होते. यावेळी ते मुंबईच्या हाजीअली परिसरात एकदा ट्रॅफिकमध्ये देखील अडकले. मात्र मंत्री असण्याचा कोणताही फायदा न घेता त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवरून सामान्य माणसांसारखा प्रवास केला. नितीन गडकरींच्या या कृतीचे मुंबईकरांकडून कौतुक होत आहे. हा सर्व प्रसंग टीव्ही 9 च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नितीन गडकरी हे मुंबईच्या रस्त्यांनी प्रवास करताना दिसते. ते एक केंद्रीय मंत्री असून देखील त्यांनी कोणताही बडेजाव न करता अगदी सामान्य प्रवाशासारखा प्रवास केला. सामान्य प्रवाशी देखील कधीकधी वाहतूक नियमांचे उंल्लघन करतात. मात्र नितीन गडकरी यांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटोकोरपणे पालन करत प्रवास केला. या प्रवासादरम्यान हाजीआली परिसरात एकदा वाहतूककोंडीत देखील अडकले होते.
सर्व वाहतुकीचे नियम पाळत नितीन गडकरी यांचा प्रवास pic.twitter.com/7irK8tjQWI
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 8, 2022
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देण्यात आली. कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पदवी प्रदान करून गडकरी यांना गौरवण्यात आले. गडकरी यांनी कृषी क्षेत्राला दिलेला जोडधंद्याचा मंत्र आणि त्यातून होत असलेली शेतकऱ्यांची प्रगती पहाता त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर ऑफ सायन्स पदवी बहाल करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठांनी सहाव्या वेतन आयोगाच्या आधी शेतकरी कसा अधिकाधिक सक्षम होईल. आपले संशोधन कसे त्याच्या उपयोगी पडेल हे पहावे असे प्रतिपादन यावेळी नितीन गडकरी यांनी केल आहे.