“जयंत पाटलांनी पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी”

| Updated on: Apr 12, 2021 | 9:57 AM

जयंत पाटील यांनी रविवारी भर पावसात सभा दणाणून सोडली. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ ते पंढरपूर मतदारसंघात होते (Sadabhau Khot slams Jayant Patil)

जयंत पाटलांनी पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी
जयंत पाटील यांची पंढरपुरात भरपावसात सभा
Follow us on

पंढरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गल्लोगल्ली फिरत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पावसात भिजण्यापेक्षा 35 गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्याची जमीन भिजवा, अशा शब्दात माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या (Pandharpur Mangalvedha Bypoll) निमित्ताने बोराळे गावात भाजप उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Awatade) यांच्या प्रचारासाठी खोत उपस्थित होते. (Former Minister Sadabhau Khot slams Jayant Patil over Rain Speech in Pandharpur Mangalvedha Bypoll)

अजित पवारांवर सदाभाऊ खोतांचा घणाघात

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप विकासाच्या मुद्द्यांवरुन लढत आहे. अजित पावर यांना पोटनिवडणुकीत काही देणेघेणे नाही. त्यांची नजर विठ्ठल सहकारी कारखान्यावर आहे. पवार घराणे राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढत आहे. अजित पवार हे गल्लोगल्ली फिरत आहेत, अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढवला.

जयंत पाटलांच्या पावसातील सभेवरुन घणाघात

जयंत पाटील यांनी रविवारी भर पावसात सभा दणाणून सोडली. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मतदारसंघात जयंत पाटलांनी सभा घेतली. पावसाच्या व्यत्ययानंतरही जयंत पाटलांनी भाषण सुरु ठेवल्याचं पाहून उपस्थितांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पावसात भिजण्यापेक्षा 35 गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवा, अशी मागणी खोत यांनी केली. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली, असंही खोत म्हणाले.

“सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपले”

निवडणुकीच्या आधी अजित पवार सातबारा कोरा करणार, असे सांगत होते. नाही केले तर पवार आडनाव लावणार नाही, असेही म्हणाल्याची आठवण सदाभाऊ खोत यांनी करुन दिली. वीज बिलाच्या मुद्द्यावर बोलताना महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपले असल्याचा घणाघात खोतांनी केला. (Former Minister Sadabhau Khot slams Jayant Patil over Rain Speech in Pandharpur Mangalvedha Bypoll)

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर मंगळवेढा पंढरपूर विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालकेंना तिकीट दिलं आहे. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जयंत पाटील यांच्या पावसातील भाषणाचा व्हिडीओ :

संबंधित बातम्या 

भर पावसात जयंत पाटलांची सभा, लोकांना शरद पवारांची आठवण

पवारसाहेब काळजी करु नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो : जयंत पाटील 

(Former Minister Sadabhau Khot slams Jayant Patil over Rain Speech in Pandharpur Mangalvedha Bypoll)