मनोहर पर्रिकरांची प्रकृती खालावली, पुढील 48 तास विशेष डॉक्टरांच्या निगराणीत

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना एंडोस्कोपीसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. मनोहर पर्रिकरांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना पुढील 48 तास विशेष डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पर्रिकर अनेक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर अमेरिकेत आणि नंतर दिल्लीतही उपचार करण्यात आले. जवळपास गेल्या एक […]

मनोहर पर्रिकरांची प्रकृती खालावली, पुढील 48 तास विशेष डॉक्टरांच्या निगराणीत
Follow us on

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना एंडोस्कोपीसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. मनोहर पर्रिकरांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना पुढील 48 तास विशेष डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पर्रिकर अनेक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर अमेरिकेत आणि नंतर दिल्लीतही उपचार करण्यात आले.

जवळपास गेल्या एक वर्षापासून पर्रिकर आजाराशी झुंज देत आहेत. शिवाय गोव्याचं मुख्यमंत्रीपदही ते सांभाळत आहेत. त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. पण भाजपकडून या वृत्ताचं खंडण करण्यात आलं असून पर्रिकरांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय.

गोव्याचे नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दुपारी पर्रिकरांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. बाहेर चर्चा आहे त्याप्रमाणे काहीही नसून त्यांच्याशी मी चर्चा केली आणि प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती विजय सरदेसाई यांनी दिली होती. विविध विकासकामांबद्दल पर्रिकरांशी चर्चा केली आणि त्यांनी एका प्रकल्पावर सही केल्याचंही सरदेसाई यांनी सांगितलं.

पर्रिकरांवर अगोदर अमेरिकेत उपचार करण्यात आले आणि त्यानंतर दिल्लीतील एम्समध्येही त्यांच्यावर उपचार झाले. नुकतेच ते नियमित तपासणीसाठी दिल्लीला जाऊन आले आहेत. पण आता एंडोस्कोपीसाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आजारपणासोबतच ते गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचाही कार्यभार सांभाळत आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत गोवेकरांची सेवा करणार असल्याचं पर्रिकरांनी यापूर्वीच जाहीर केलंय.