ग्रामपंचायतीच्या धुराळ्यात मंत्र्यांसह आमदारांच्या वर्चस्वालाही धक्का! पिता-पुत्रांची 40 वर्षाची सत्ता गेली

| Updated on: Sep 19, 2022 | 11:13 PM

ग्रामपंचायतीच्या धुराळ्यात मंत्र्यांसह आमदारांच्या वर्चस्वालाही धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल पहायला मिळाले आहे.

ग्रामपंचायतीच्या धुराळ्यात मंत्र्यांसह आमदारांच्या वर्चस्वालाही धक्का! पिता-पुत्रांची 40 वर्षाची सत्ता गेली
Follow us on

मुंबई : 608 ग्रामपंचायतीच्या निकालात(Gram Panchayat election ) भाजप नंबर वनचा पक्ष ठरला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी आहे, तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस तर चौथ्या क्रमांकावर शिंदे गट आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना पाचव्या स्थानावर गेली आहे. ग्रामपंचायतीच्या धुराळ्यात मंत्र्यांसह आमदारांच्या वर्चस्वालाही धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल पहायला मिळाले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला सरशी झाल्याचं पहायला मिळतंय. 594 ग्रामपंचायतींपैकी 258 ग्रामपंचायतींवर मविआने विजय मिळवलाय. तर भाजप-शिंदे गटाने 228 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावलाय.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप आणि राष्ट्रवादीत काँटे की टक्कर पहायला मिळली. भाजपने 188 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीने 136 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. 188 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावत भाजप एक नंबरचा पक्ष ठरलाय. भाजपनंतर राज्यात राष्ट्रवादीला मतदारांची पसंती पहायला मिळतेय. 136 जागा जिंकत राष्ट्रवादी ग्रामपंचायत निकालात राज्यात नंबर दोनचा पक्ष ठरलाय.

शिवसेना पक्ष फुटीचा मोठा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरेंना बसलाय. शिवसेनेला केवळ 37 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला असून ते पाचव्या स्थानावर आहेत. तर, 40 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत शिंदे गट चौथ्या स्थानावर आहे.

या दिग्गजांच्या वर्चस्वाला धक्का

  1. नगर जिल्ह्यातील राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत पिचड-पिता पुत्रांच्या वर्चस्वाला धक्का बसलाय. चुरशीच्या लढतीत सरपंचपदी राजूर विकास आघाडीच्या पुष्पाताई निगळे यांचा विजय झालाय. अवघ्या 19 मतांनी सरपंचपदी महाविकास आघाडीचा विजय झालाय. मधुकर पिचड यांच्या 40 वर्षांच्या सत्तेला धक्का बसलाय.
  2. नंदूरबारच्या दुधाळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात मंत्री विजयकुमार गावितांना धक्का बसलाय. गावित यांची पुतणी प्रतिक्षा जयेंद्र वळवी यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झालाय. शिंदे गटाच्या अश्विनी प्रकाश मालचे यांनी त्यांचा पराभव केला.
  3. बुलढाण्यात आमदार संजय कुटे यांना धक्का बसलाय. सायखेड ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.
  4. पुणे जिल्ह्यातील 61 पैकी 30 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवलीय. दिलीप वळसे पाटील आणि अतुल बेनकेंच्या नेतृत्वात पुण्यात राष्ट्रवादीला शिंदे गट आणि भाजपला रोखण्यात यश आलंय.
  5. संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत खातं उघडलंय. नाशिकच्या गणेशगाव ग्रामपंचायतीत रुपाली ठमकेंचा विजय झालाय…स्वराज्य संघटनेच्या प्रभावाखाली ग्रामपंचायत म्हणून गणेशगावची ओळख निर्माण झालंय.
  6. यवतमाळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेनं खातं उघडलंय. मारेगाव तालुक्यातील खडणी ग्रामपंचायतीत मनसेचा विजय झालाय.
  7. सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनलचा विजय झालाय. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनलचा त्यांनी पराभव केलाय.
  8. परभणीच्या कौसळी ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेसने भाजप आणि राष्ट्रवादीला धोबीपछाड दिलाय. काँग्रेसचे मोबीन कुरेशी यांची सरपंचपदी निवड झालीय.
  9. नंदुरबार तालुक्यातील नंदपूर ग्रामपंचायतीत ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून शिंदे गटाने बाजी मारलीये. ईश्वर चिठ्ठीत रोहिणी गुलाबसिंग नाईक या विजयी झाल्या आहेत.