गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांजवळ बसायचे पण जळगावसाठी निधी आणला नाही, गुलाबराव पाटलांचा आरोप

| Updated on: May 02, 2021 | 6:03 PM

गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांजवळ बसत होते पण त्यांनी जिल्ह्यासाठी काहीही केले नाही, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. Gulabrao Paitl Girish Mahajan

गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांजवळ बसायचे पण जळगावसाठी निधी आणला नाही, गुलाबराव पाटलांचा आरोप
गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री
Follow us on

जळगाव: पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या विकासाच्या मुद्यावरुन माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजनांवर टीकास्त्र सोडलं आहे. जळगाव शहरासाठी 100 कोटी आणू, 200 कोटी आणू अशा वल्गना भाजप नेते गिरीश महाजन यांनी केल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तेव्हा तर गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांजवळ बसत होते. ते निधी आणू शकत होते. पण त्यांनी जिल्ह्यासाठी काहीही केले नाही, असा आरोपही त्यांनी केला. (Gulabrao Paitl slam Girish Mahajan over development of Jalgaon)

100 कोटी आणू, 200 कोटी आणू या केवळ वल्गना

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी 100 कोटी आणू, 200 कोटी आणू अशा वल्गना भाजप नेते गिरीश महाजन यांनी केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी शहराची वाट लावली’, असा घणाघाती आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

जळगाव महापालिकेला 61 कोटी

जिल्हा नियोजन समितीतून जळगाव महापालिकेला विविध विकासकामांसाठी 61 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. गेल्या काळात पालकमंत्री असताना भाजपचे चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांनी शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून किती रुपये दिले याची आकडेवारी दाखवावी. मी एका वर्षात 61 कोटी रुपये देऊ शकतो. तर यांनी काय दिले ते जाहीर करावे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर गुलाबराव पाटील काय म्हणाले?

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, “पश्चिम बंगालमधील जनतेने राज्यात कोण नेतृत्त्व करू शकतो, जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो, याचा विचार करूनच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे ममता दीदींच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला थेट केंद्रातून सर्व प्रकारची रसद पुरवली गेली. पण त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्त्व करणारा चेहरा नसल्यानेच ममता दीदींच्या बाजूने जनमताचा कौल गेला असे मला वाटते. कोणत्याही राज्याचा नागरिक केंद्राच्या वेळी वेगळ्या पद्धतीने मतदान करतो. राज्याच्या वेळी तो वेगळ्या पद्धतीने करतो. ममता दीदींनी राज्याचे नेतृत्त्व करावे, हे पश्चिम बंगालमधील लोकांच्या मनात पक्के होते. हे सिद्ध झाले आहे.

संबंधित बातम्या:

लाश वही है, बस कफन बदल गया है, बंगालच्या निकालावर गुलाबराव पाटलांचं भाष्य

West Bengal Election Results 2021 LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींपुढे मोदी-शाहांचा करिष्मा फेल, तृणमूल काँग्रेसला 203 जागांवर आघाडी

(Gulabrao Paitl slam Girish Mahajan over development of Jalgaon)