राणेंसाठी आम्ही जेव्हा फायटर होतो, तेव्हा त्यांचे पोट्टे बनियनवर होते, त्यांनी शिकवू नये, गुलाबरावांचा हल्लाबोल

| Updated on: Aug 11, 2020 | 3:40 PM

"आमदार नितेश राणे यांच्या वडिलांमागे आम्ही उभे होतो, तेव्हा नारायण राणे फायटर बटालियनमध्ये माझं नाव घ्यायचे. आता नारायण राणेंना मी वाईट कसा वाटायला लागलो?", असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला (Gulabrao Patil slams Narayan Rane and Nitesh Rane).

राणेंसाठी आम्ही जेव्हा फायटर होतो, तेव्हा त्यांचे पोट्टे बनियनवर होते, त्यांनी शिकवू नये, गुलाबरावांचा हल्लाबोल
Follow us on

अहमदनगर :भाजप खासदार नारायण राणे जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा आम्ही त्यांचे पाठीराखे होतो. त्यावेळी त्यांचे पोट्टे बनियनवर होते. त्यामुळे त्यांनी मला शिकवू नये”, असा टोला शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे (Gulabrao Patil slams Narayan Rane and Nitesh Rane).

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनानंतर परिवाराचं सांत्वन करण्यासाठी गुलाबराव पाटील आज (11 ऑगस्ट) अहमदनगरला आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली (Gulabrao Patil slams Narayan Rane and Nitesh Rane).

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“आमदार नितेश राणे यांच्या वडिलांमागे आम्ही उभे होतो, तेव्हा नारायण राणे फायटर बटालियनमध्ये माझं नाव घ्यायचे. आता नारायण राणेंना मी वाईट कसा वाटायला लागलो?”, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

“मी छत्तीस वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नये. मी निष्ठावंत आहे. गद्दारांच्या यादीत माझं नाव नाही”, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. त्याचबरोबर “नैराश्यात असलेल्या माणसाला काही उद्योग नसतो”, असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी काढला.

गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी “नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत”, अशा शब्दात टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

“गुलाबराव पाटील यांच्या नावातच गुलाब आहे. त्यामुळे त्यांना मी काय उत्तर देणार? गुलाब ज्यांच्या नावात असेल त्यांनी धंद्याविषयी बोलू नये. नारायण राणे यांची उंची किती? गुलाबराव पाटील शुद्धीवर किती तास असतात? याची माहिती घेऊन उत्तर देऊ”, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले होते?

“नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात. शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते.” असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला होता.

“नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री असताना कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी तर काही बोलूच नये. ते जर असे काही बोलले नाहीत, तर त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही” असा चिमटा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी राणेंना काढला होता.

संबंधित बातमी :

राणेंना कामधंदा उरला नाही, घरी एक बोलतात, बाहेर वेगळेच : गुलाबराव पाटील

संबंधित व्हिडीओ :