Hanuman Chalisa Row : घरी यायचे असेल तर जरुर या, सांगून या, राणा जोडप्याच्या हनुमान चालीसा आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं

| Updated on: Apr 25, 2022 | 8:32 PM

घंटाधारी लोकांनी गदाधारी लोकांना शिकवू नये, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. तुमची संस्कृती असेल तर या घरात पण नीट या, दादागिरी करुन याल तर मोडून काढू, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याला दिलाय. ते आज मुंबईतील 'बेस्ट'च्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते.

Hanuman Chalisa Row : घरी यायचे असेल तर जरुर या, सांगून या, राणा जोडप्याच्या हनुमान चालीसा आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं
उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर हल्लाबोल
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे (Mosque Loudspeaker)आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. तर हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन राणा दाम्पत्य आणि भाजपने राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आमचं हिंदुत्व घंटाधारी नाही तर गदाधारी आहे. घंटाधारी लोकांनी गदाधारी लोकांना शिकवू नये, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. तुमची संस्कृती असेल तर या घरात पण नीट या, दादागिरी करुन याल तर मोडून काढू, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याला दिलाय. ते आज मुंबईतील ‘बेस्ट’च्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅप वन सिंगल कार्डचं उद्धाटन

दादागिरी करुन याल तर.. मुख्यमंत्र्यांचा इशारा

घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आमचं गदाधारी हिंदुत्व आहे. इकडे हनुमान चालिसा असेल करा पठण. रामदास स्वामींनीही भीमरुपी महारुद्रा लिहून ठेवलं आहे. ते भीम रुप आणि महारुद्र शिवसेना दाखवून देईल. कारण आमचं हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे. हनुमान चालिसा बोलायची आहे तर या. तुमच्या घरात ती संस्कृती नसेल तर आमच्या घरात या. पण त्याला एक पद्धत असते. साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा… आमच्या घरी साधू संत येत असतात. पण ते सांगून येतात. आलात तर स्वागत करु. पण दादागिरी करुन याल तर दादागिरी कशी मोडायची ते आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत सांगितलं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरे लवकरच जाहीर सभा घेणार

लवकरात लवकर एक जाहीर सभा घ्यायची अशी माझी इच्छा आहे. सध्या जाहीर सभांचं पेव फुटलंय. तिकडे मला एकदा मास्क काढून बोलायचं आहे. एकदा काय तो परामर्श आणि सोक्षमोक्ष मला लावूनच टाकायचा आहे. हे तकलादू हिंदुत्ववादी आले आहेत, नकली, नवहिंदू.. तेरी कमिज मेरी कमिज से भगवी कैसे? हा त्यांचा पोटशूळ आहे. त्यांचा समाचार एकदा मला घ्यायचा आहेच आणि तो मी घेणारच आहे, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनि विरोधकांना दिलाय.

हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का?

शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं? हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का, की नेसलं आणि सोडलं म्हणायला. एक मुद्दा मी मुद्दाम सांगेन, जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत, त्यांना मला विचारायचं आहे की तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं? बाबरी पाडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा तुमच्या सरकारने घेतलेला नाही. तर तो कोर्टाने घेतलेला आहे आणि ते बांधताना सुद्धा तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवल्या आहेत. मग तुमचं हिंदुत्व आहे कुठे? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना केलाय.

इतर बातम्या :

Devendra Fadnavis Video : राणे साहेब या ना, या, प्रेस कॉन्फरन्स थांबवत फडणवीसांनी ‘ती’ खुर्ची राणेंना दिली, दरेकरांची जागा बदलली

Navneet Rana Court Comments : तुम्हाला जबाबदारी कळायला हवी, बॉम्बे हायकोर्टानं नवनीत राणांना फटकारलं, कोर्टात नेमकं काय घडलं?