पूनमताई, प्रमोद महाजनांना प्रवीणने गोळ्या का झाडल्या, हे सांगायला दोन मिनिटं लागणार नाहीत : आव्हाड

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : “प्रवीण महाजनने प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या? याचे अंतर्गत जे काही कांगोरे आहेत, ते काही जणांना माहित आहेत. त्यापैकी मी एक आहे. आमच्या बापाला बोलाल, तर खबरदार. मर्यादा सोडायला दोन मिनिटंही लागणार”, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना प्रत्युत्तर दिले आहे. “प्रवीण महाजनने प्रमोद […]

पूनमताई, प्रमोद महाजनांना प्रवीणने गोळ्या का झाडल्या, हे सांगायला दोन मिनिटं लागणार नाहीत : आव्हाड
Follow us on

मुंबई : “प्रवीण महाजनने प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या? याचे अंतर्गत जे काही कांगोरे आहेत, ते काही जणांना माहित आहेत. त्यापैकी मी एक आहे. आमच्या बापाला बोलाल, तर खबरदार. मर्यादा सोडायला दोन मिनिटंही लागणार”, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना प्रत्युत्तर दिले आहे.

“प्रवीण महाजनने प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या? याचे अंतर्गत जे काही कांगोरे आहेत, ते काही जणांना माहित आहेत. त्यापैकी मी एक आहे. आमच्या बापाला बोलाल, तर खबरदार. मर्यादा सोडायला दोन मिनिटंही लागणार नाहीत. पण दोघांचेही (शरद पवार आणि प्रमोद महाजन) संबंध होते, त्याची तरी आपल्याला आठवण यायला हवी होती.” असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“पूनमताई महाजन, आपल्या वडिलांचे आणि पवार साहेबांचे किती मैत्रीचे संबंध होते, याचा विसर आपल्याला आज कसा काय पडला? महाभारतातील कुठल्यातरी काल्पनिक पात्राचं उदाहरण आपण पवारसाहेबांच्या नावाने दिलं, हे तुम्हाला शोभत नाही. सभ्येतीची पातळी आम्ही कुठल्याही क्षणाला ओलांडू शकतो. पण आमच्यावरील संस्कार.” – जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे नेते

पूनम महाजन काय म्हणाल्या होत्या?

“तुम्ही दाखवत असाल की, सगळ्यांचे ऐकत आहात. मात्र, शकुनी मामासारखं सगळ्या ठिकाणी नाक लावून लावून महाभारत सुरु केलं, असे आपण शरद पवार आहात. अशी महागठबंधनची गोष्ट आहे. बघितलं ना, शकुनी मामा कसा असतो? स्वत:ला मिळालं नाही ना, तर इकडचं तिकडे आणि तकडचं इकडे. मंथरा असो शकुनी मामा असो, हे महागठबंधनचे चेहरे आहेत.” असे खासदार पूनम महाजन म्हणाल्या होत्या.

VIDEO : पूनम महाजन काय म्हणाल्या होत्या?