…तर मला वेगळा विचार करावा लागेल : एकनाथ खडसे

जर असाच माझ्यावर अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल," असे वक्तव्य भाजप नेते एकनाथ खडसे यांनी (Eknath khadse on Rebellion) केले.

...तर मला वेगळा विचार करावा लागेल : एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Dec 07, 2019 | 8:06 PM

जळगाव : “माझा पक्ष सोडण्याचा विचार नसला तरी जाणीवपूर्वक काही लोकांकडून माझा अपमान करण्याचा प्रयत्न होत (Eknath khadse on Rebellion) आहे. काही व्यक्ती जाणीवपूर्वक अपमान करत  (Eknath khadse on Rebellion)  आहेत. त्यामुळे त्याची नोंद मला घ्यावी लागेल. शेवटी मी माणूस आहे, देव नाही. मलाही भावना आहेत. जर असाच माझ्यावर अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल,” असे वक्तव्य भाजप नेते एकनाथ खडसे यांनी (Eknath khadse on Rebellion) केले.

“मी पक्ष सोडणार नाही. पण एवढं निश्चित आहे जळगाव जिल्ह्याची मिटींग होती. उत्तर महाराष्ट्राची मिटींग होती. तर मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या बैठकीसाठी बोलवलं.मला निर्णय प्रक्रियेतून काढून टाकण्यात आलं आहे. मला आता कोअर ग्रुपमधून काढून टाकण्यात आलं आहे. अशा प्रत्येक ठिकाणी अन्यायाने वागणूक होत असेल जाणीवपूर्वक मला दूर ठेवत असतील तर मी काय करावे.” असा प्रश्नही खडसेंनी महाराष्ट्रातील जनतेला (Eknath khadse on Rebellion) विचारला.

“शेवटी मी माणूस आहे मी देव नाही मला भावना आहे. त्यामुळे जो निर्णय घ्यायचा असेल तो पक्षाशी बोलून घेईल. जी जबाबदारी पक्ष देईल ती घेईन. वारंवार अत्याचार अन्याय झाला तर मला वेगळा विचार करावा लागेल.” असेही खडसेंनी ठामपणे सांगितले.

भाजपने पक्षातील नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु केल्याचं दिसत आहे. भाजपच्या विभागीय कोअर कमिटीच्या बैठकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची समजूत घालण्यासाठी जळगावात गेले होते. या बैठकीनंतर एकनाथ खडसेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“चंद्रकांत पाटील यांच्याशी मी जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील निवडणुकाबाबत चर्चा केली. त्यात रोहिणी खडसेंच्या मतदारसंघात पक्षाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आणि त्यांचा पराभव फक्त 1800 मतांनी झाला. त्याबाबत माझ्याकडे जे पुरावे होते. त्यात फेसबुक पोस्ट, ऑडियो क्लिप, एकमेकांचे झालेले संभाषण जे पक्षविरोधी होतं. याबद्दलचे आणखी काही पुरावे हे चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले. त्यावेळी मी त्यांना हे पुरावे माध्यमांना दाखवण्याची परवानगी द्यावी.” असे त्यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले.

अमित शाहांची चर्चा करु 

“हा पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. जर तुम्ही असे केलात, तर पक्ष शिस्तीचा भंग होऊ शकतो. असे मला चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याबाबत आपण अमित शाह, जे.पी नड्डा यांच्याशी चर्चा करु आणि तुम्हाला योग्य न्याय मिळवून देऊ. तसेच ज्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई किंवा अन्य कारवाई करु,” असेही खडसे (Eknath khadse on Rebellion) म्हणाले.

“मुळात मी ओबीसी नेतृत्वावर अन्याय झाला असे कधीही बोललो नाही. मी बहुजन समाज आणि ओबीस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अन्याय होतो आहे अशी त्यांच्यात भावना आहे. कार्यकर्ते आजही माझ्याशी बोलताना असे बोलतात. त्यांना आमच्याविरोधात अन्याय होतो असे वाटते,” असे स्पष्टीकरणही खडसेंनी दिले.

“भाजपला सत्तेवर बसवण्यामागे ओबीसी नेत्यांनीही रात्रीचा दिवस केला. त्यांनीही परिश्रम केले. त्यांचेही योगदान आहे. त्यामुळे पक्ष मोठा झाला. शेवटी एकमेकांची मदत होते. त्यामुळे नेतृत्व मिळालं आणि म्हणूनच पक्ष विस्ताराला वाव मिळाला. त्यामुळे निव्वळ ओबीसी नेत्याला मोठं केले. मात्र ओबीसी नेत्यांमुळे पक्ष मोठ झाल हे तरी विसरु नका. ही कार्यकर्त्यांची भावना आहे. ती पक्षाने तपासावी.” असा टोलाही एकनाथ खडसेंनी लगावला.

40 वर्षे पक्षासाठी मेहनत, मात्र 4 दिवसात बदनामीचा प्रयत्न

“एकनाथ खडसेंनी गेली 40 वर्षे हमाली केली, मेहनत केली त्याचे फळ मला मिळाले. मला पक्षाने काही दिलं नाही असे मी म्हणत नाही. मला पक्षाने खूप काही दिलं आहे. पण याचा अर्थ ज्याने 40 वर्ष पक्षासाठी मेहनत केली. रक्ताचे पाणी केले. त्याला 4 दिवसात बदनाम करण्याचा प्रयत्न नाही झाला का, काहीही नसताना चौकशींचा फेरा माझ्यामागे लागला नाही का?” असे प्रश्नही खडसेंनी यावेळी उपस्थित केले.

“जर मी दोषी असेल भ्रष्टाचारी असेल जर पक्षाविरोधी असेल तर कारावाई करावी. मी त्याबाबत सहमत आहे. पण काहीच नसताना माझ्यावर का कारवाई केली. त्याचे कारण काय हे तरी सांगा, भ्रम असेल तो दूर होईल. दुसऱ्याला कोणाला संधी द्याची आहे त्यामुळे टार्गेट केलं गेलं. अशी भावना निर्माण झाली.” असेही ते यावेळी म्हणाले.

“एकनाथ खडसे कुठल्या तरी स्पर्धेत आहे. पण तो स्पर्धेत येऊच नये यासाठी जाणीवपूर्वक खडसेंच्या मागे लागलं तर त्याला अन्याय नाही तर न्याय म्हणायचं का?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.