Sanjay Raut : स्वतंत्र संसार मांडा, शिवसेनेचाच आश्रय कशाला? राऊतांनी शिंदे गटाला फटकारले

| Updated on: Jul 16, 2022 | 11:03 AM

पक्षातून बंड केलेल्या सर्वच आमदारांना सध्या भाजपाचा पुळका आलेला आहे. पण यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. ज्यांना-ज्यांना भाजपाचा पुळका आलेला होता त्यांचा पराभव झालेला आहे. अशी अनेक उदाहणे आहेत आणि हा इतिहास बदलला जाईल इतकी ताकद शिंदे गटामध्ये नसल्याचेही राऊत म्हणाले आहेत. एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोबत आलेल्या आमदारांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे तर दुसरीकडे शिवसेनेबरोबर दगाबाजी करणाऱ्यांची काय गत होते ते राऊतांनी सांगितले आहे.

Sanjay Raut : स्वतंत्र संसार मांडा, शिवसेनेचाच आश्रय कशाला? राऊतांनी शिंदे गटाला फटकारले
शिवसेना खा. संजय राऊत
Follow us on

मुंबई : (Shivsena) शिवसेनेतील आमदारांच्या भूमिकेनंतर आता शिंदे गटाकडून थेट शिवसेना पक्षावरच दावा केला जात आहे. सध्या हे प्रकरण (Supreme Court) कोर्टात असले तरी आता शिवसेना सोडली म्हणल्यावर आता अपेक्षा न ठेवता आपला स्वतंत्र संसार मांडा. काही आमदारांच्या बंडामुळे पक्षाला काही फरक पडणार नाही. शिवसेना-शिवसेना करण्यापेक्षा पक्षाची स्थापना करा आणि मतदारांपुढे जावा म्हणजे अस्तित्व लक्षात येणार आहे. ही बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे आणि भविष्यातही राहिल असा विश्वास (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. सध्या शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ही शिंदे गटाकडून केली जात आहे. त्यामुळे नेमकी शिवसेना कुणाची हा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लागणार आहे.

शिवसेने शिवाय स्थान निर्माण करा अन् स्वाभिमान जपा

जो स्वाभिमानाचा मुद्दा घेऊन पक्षातील आमदारांनी बंड केले त्यांना आता स्वाभिमान दाखवून द्यायची संधी आहे. पण त्यांनी शिवसेनेच्या पंखाखाली राहून आपला स्वाभिमान जपू नये. त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. ज्या मुद्द्यावरून आपण ही भूमिका घेतली त्या सर्व आमदारांना राऊतांनी थेट इशारा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. अनेकांनी पक्ष सोडूनही शिवसेना नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस उजाडत नाही त्यांना स्वत:चा स्वाभिमान दाखवून देण्यासाठी चांगली संधी असल्याचे म्हणत शिंदे गटाला फटकारले आहे.

ज्यांना भाजपाचा पुळका त्यांचा पराभव अटळ

पक्षातून बंड केलेल्या सर्वच आमदारांना सध्या भाजपाचा पुळका आलेला आहे. पण यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. ज्यांना-ज्यांना भाजपाचा पुळका आलेला होता त्यांचा पराभव झालेला आहे. अशी अनेक उदाहणे आहेत आणि हा इतिहास बदलला जाईल इतकी ताकद शिंदे गटामध्ये नसल्याचेही राऊत म्हणाले आहेत. एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोबत आलेल्या आमदारांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे तर दुसरीकडे शिवसेनेबरोबर दगाबाजी करणाऱ्यांची काय गत होते ते राऊतांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे आणि भाजपकडून लोकशाहीला धोका

राज्यात मंत्रिमंडळाविना सरकार सुरु आहे. त्यामुळे हे सरकारच कायदेशीर नाही. तर केंद्रात लोकप्रतिनीधींना आपल्या समस्या मांडण्याचे स्वातंत्र नाही. यापूर्वी संसदीय अधिवेशनात पायऱ्यावर बसून आंदोलने केली जात होती. पण यावर केंद्राने बंदी आणली आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठता कामा नये हीच भावना केंद्राची झाली आहे. तर राज्यात सरकारचाच कारभार बेभरवश्याचा झाला आहे. एक दुजे के लिए..यानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच निर्णय घेत असल्याने देशात लोकशाहीला धोका असल्याचेही राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.