AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan National Assembly dissolved: अखेर पाकिस्तानची संसद बरखास्त, 90 दिवसाच्या आत निवडणुका घ्यावा लागणार

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शिफारशीनंतर अखेर पाकिस्तानची नॅशनल असेंबली (संसद) बरखास्त करण्यात आली आहे. इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे संसद बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Pakistan National Assembly dissolved: अखेर पाकिस्तानची संसद बरखास्त, 90 दिवसाच्या आत निवडणुका घ्यावा लागणार
अखेर पाकिस्तानची संसद बरखास्त, 90 दिवसाच्या आत निवडणुका घ्यावा लागणारImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 03, 2022 | 4:21 PM
Share

लाहोर: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या शिफारशीनंतर अखेर पाकिस्तानची नॅशनल असेंबली (संसद) (pakistan assembly) बरखास्त करण्यात आली आहे. इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे संसद बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात (pakistan) 90 दिवसात म्हणजे तीन महिन्यात निवडणुका घेणं बंधनकारक आहे. तोपर्यंत इम्रान खान हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहे. मात्र, अविश्वास प्रस्ताव फेटाळल्या गेल्यानंतर इम्रान खान यांनी संसदभंग करण्याची शिफारस करून विरोधकांना चीतपट केलं आहे. इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी करण्याची आणि त्यांना अटक करण्याची विरोधकांची खेळी इम्रान खान यांनी मोठ्या चतुराईने उधळून लावली आहे. तर, नव्याने निवडणुका होणार असल्याने इम्रान खान यांची पुन्हा सत्तेत वापसी होणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री फारूख हबीब यांनी याबाबतची माहिती दिली. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधानांच्या शिफारशीची दखल घेऊन नॅशनल असेंबली बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींनी 90 दिवसात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, असं हबीब यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळही बरखास्त

मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आलं आहे, अशी माहिती माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी दिली. विशेष म्हणजे अविश्वास प्रस्तावावर मतदान झालं असतं तर इम्रान खान यांची सत्ता गेली असती. 342 सदस्य संख्या असलेल्या नॅशनल असेंबलीत बहुमतासाठी 172 सदस्यांचा आकडा आवश्यक आहे. मात्र, इम्रान खान यांच्या विरोधात त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड पुकारलं होतं. त्यामुळे इम्रान खान यांची सत्ता जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, इम्रान खान यांच्या खेळीमुळे संसद भंग कररण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

अविश्वास प्रस्ताव परदेशी षडयंत्र

दरम्यान, इम्रान खान यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अविश्वास प्रस्ताव हा परदेशी षडयंत्र होतं, असा आरोप केला आहे. राष्ट्रपतींना संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. निवडणुकीनंतरच कोण पाकिस्तानवर राज्य करेल हे दिसून येईल, असं खान यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

Pakistan Political Crisis: इमरान खान नॉटआऊट! अविश्वास प्रस्ताव रद्द का झाला? 10 मुद्द्यांमधून समजून घ्या!

Imran Khan No-Trust Vote: संसद बरखास्त करा, इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस; अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर मोठा निर्णय

डिजिटल इकोनॉमीसाठी नेपाळला भारताची मदत… जाणून घ्या काय होईल फायदा

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?