Pakistan Political Crisis: इमरान खान नॉटआऊट! अविश्वास प्रस्ताव रद्द का झाला? 10 मुद्द्यांमधून समजून घ्या!

Imran Khan Politics: अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. अनुच्छेद पाचचा भंग असल्याचं म्हणत हा अविश्वास ठराव रद्द करण्यात आल्याचं सूरी यांनी म्हटलंय.

Pakistan Political Crisis: इमरान खान नॉटआऊट! अविश्वास प्रस्ताव रद्द का झाला? 10 मुद्द्यांमधून समजून घ्या!
इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 3:35 PM

नवी दिल्ली : इमरान खान (No Confidence motion against Imran Khan) यांची खुर्ची जाणार, की वाचणार? असा प्रश्न गेला आठवड्याभरापासून चर्चेत आला होता. अखेर पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीचे (Pakistan National Assembly) डेप्युटी स्पीकर कासीम खान सूरी यांनी इमरान खान यांना मोठा दिलासा दिलाय. त्यांच्याविरोधातील अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. अनुच्छेद पाचचा भंग असल्याचं म्हणत हा अविश्वास ठराव रद्द (Imran Khan no confidence motion Rejected) करण्यात आल्याचं सूरी यांनी म्हटलंय. अध्यक्ष असद कैसर यांच्याविरोधात विरोधी पक्षानं अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर अध्यक्षपदाची सूत्र ही उपाध्यक्ष कासीम खान सूरी यांच्याकडे देण्यात आली होती. उपाध्यक्ष असल्याच्या नात्यानं त्यांनी फेटाळलेला अविश्वास प्रस्ताव हा ऐतिहासिक निर्णय मानला जातो आहे. त्यांच्या या निर्णयाचं पाकिस्तानातील विरोध पक्षांनी जोरदार खंडन केलंय. याच संदर्भातील 10 मोठे मुद्दे नेमके कोणते आहेत, ते जाणून घेऊयात..

TOP 10 : इमरान खान यांना मोठा दिलासा

  1. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत 8 मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. इमरान खान यांच्या कूटनीतीमुळे पाकिस्तानात महागाई वाढल्याचा आरोप अविश्वास प्रस्तावाद्वारे करण्यात आला होता. त्याचप्रमाणे इमरान खान सरकारच्या आर्थिक धोरणांवरुनही निशाणा साधला गेला होता.
  2. विरोधी पक्षांनी इमरान खान सरकारला आव्हान दिलं होतं. इमरान खान सरकार पाडण्यासाठी 343 पैकी 172 सदस्यांचा पाठिंबा  गरजेचा होता. त्यावेळी विरोधी पक्षानं आपल्याकडे 177 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता.
  3. इमरान खान यांच्याविरोधात पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत 28 मार्च रोजी पहिल्यांदा अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. यावेळी अविश्वास प्रस्तावावर 31 मार्च रोजी चर्चा करुन त्यावर मतदान घेतलं जाईल, असं ठरवण्यात आलं.
  4. पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी दरम्यानच्या काळात सर्वच विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला होता. सरकार पाडण्याचा घाट घालण्यासाठी एक विदेशी कट रचला जात असल्याचा सनसनाटी आरोप इमरान खान यांनी केला.
  5. इमरान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्वावावर 31 मार्च रोजी एका विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं. या सत्रात सुरुवातीच्या काही मिनिटांतच सभागृहाचं कामकाज तीन एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. तीन एप्रिलला या प्रस्तावावर मतदान घेतलं जाईल, असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
  6. दरम्यान 2 एप्रिल रोजी इमरान खान यांनी पाकच्या पीटीआय म्हणजेच पाकिस्तान पहरीक ए इंसाफच्या सर्व समर्थकांना या विदेशी कटाच्या विरोधात निषेध नोंदवण्याचं आवाहन केलं होतं. शांततेचा मार्ग अवलंबून आपला निषेध प्रत्येकानं नोंदवावा, असं इमरान खान यांनी म्हटलं होतं.
  7. 3 एप्रिल रोजी पाक संसदेत अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. यावेळी इमरान खान यांची खूर्ची आता जाणार, असा विश्वास विरोधकांना वाटत होतं. मात्र असं झालं नाही!
  8. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेतील उपाध्यक्षांनी रविवारी हा अविश्वास ठराव रद्दबातल ठरवला. पाकिस्तानच्या संविधानातील अनुच्छेद पाचच्या विरोधात हा अविश्वास ठराव असल्याचं सांगत, हा प्रस्ताव रद्द करण्यात आला.
  9. अविश्वास प्रस्ताव रद्द होताच इमरान खान यांनी राष्ट्रपती आरीफ अल्वी यांना संसद बरखास्त करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच नव्यानं निवडणूक घेण्याची मागणीदेखील केली आहे.
  10. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरीफ अल्वी यांनीही इमरान खान यांचा सल्ला विचारात घेत संसद बरखास्त केली. आता पाकिस्तानात लवकरच पुन्हा एकदा निवडणुकांच्या रणधुमाळी इमरान खान यांच्या पाठीशी पाकिस्तानातील जनता उभी राहते का, हे पाहणं महत्त्वाचंय.

पाहा थेट आढावा :

संबंधित बातम्या :

श्रीलंकेत संचारबंदीनंतर आता सोशल मीडियावरही बॅन, फेसबूक, ट्विटर आणि WhatsApp आऊट ऑफ सर्व्हिस

रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे मोदींनी युद्धबंदीसाठी मांडलं परखड मत, भेटीत आणखी काय चर्चा?

जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ लपून मोदींना भेटले, इम्रान खान यांचा पुन्हा खळबळजनक दावा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.