Imran Khan : जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ लपून मोदींना भेटले, इम्रान खान यांचा पुन्हा खळबळजनक दावा

पाकिस्तान सरकार (Pakistan Government) सध्या धोक्यात आहे. त्यामुळे सरकार वाचवण्याचा प्रत्येक प्रयत्न इम्रान खान यांच्याकडून सुरू आहेत. अशात इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींचं (Pm Modi) नाव घेत टीका केली आहे.

Imran Khan : जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ लपून मोदींना भेटले, इम्रान खान यांचा पुन्हा खळबळजनक दावा
इम्रान खान यांचा पुन्हा खळबळजनक दावाImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 11:40 PM

पाकिस्तान : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी मीडियासमोर येत आपली निराशा व्यक्त केली आहे. पाकिस्तान सरकार (Pakistan Government) सध्या धोक्यात आहे. त्यामुळे सरकार वाचवण्याचा प्रत्येक प्रयत्न इम्रान खान यांच्याकडून सुरू आहेत. अशात इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींचं (Pm Modi) नाव घेत टीका केली आहे. नवाज शरीफ हे नरेंद्र मोदींना जीव वाचवण्यासाठी लपून छपून नेपाळमध्ये भेटत होते. पाकिस्तानी सैन्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ यांचा हा प्रयत्न सुरू होता. असा खळबळजनक दावा आज इम्रान खान यानी केला आहे. त्यामुळे आता भारताकडूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. सध्या जगाचे लक्ष पाकिस्तानमधील घडामोडींकडे लागले आहे. काही दिवसातच इम्रान खान सरकार राहणार की जाणार याचा अंतिम फैसला होणार आहे.

इम्रान खान यांचा खळबळजनक दावा

मोदी लष्करप्रमुखाला दहशतवादी बोलले-इम्रान खान

जनरल शरीफला नरेंद्र मोदी दहशतवादी म्हणत होते. आणि नवाज शरीफ मोदींचं कौतुक करत होते, अशा वेळी मी तर शांत बसलो नसतो. मात्र नवाज शरीफ दोस्ती करत होते. आणि मोदीही शरफी यांच्या घरच्या लग्नसोहळ्यात हजरे लावत होते. एकिकडे ड्रोन हल्ल्यात सर्वसामान्य लोक मारले जात होते आणि नवाज शरीफ म्हणत होते, मला नाही फरक पडत त्यांच्या मरण्याने, ही कोणती पद्धत आहे? असा सवालही इम्रान खान यांनी केला आहे. आजच्या इम्रान खान यांच्या बोलण्याने भारताविषयीचा त्यांच्या मनातला द्वेष पुन्हा जगाला दिसला आहे. त्यामुळे याचे जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

इम्रान खान सरकारचं काय होणार?

सरकार पाडण्यामध्ये परदेशी शक्तींचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. इमरान खान यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ 3 वर्ष 10 महिने पूर्ण झालाय. तर, अजून त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी कालावधी शिल्लक असतानाच त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला गेला आहे. मात्र, पाकिस्तानात आतापर्यंत एकही पंतप्रधान त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकलेला नाही. इम्रान खान यांच्या सरकारचा फैसला पुन्हा अविश्वास ठरावावर मतदान घेऊन केला जााणार आहे. पाकिस्तानी लष्करानं गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षात कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असं शाहबाज शरिफ यांनी म्हटलं आहे. शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत. त्यांना पीएम प्रोटोकॉल देण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सध्या जगाचे लक्ष पाकिस्तानकडे लागले आहे.

पाकिस्तानात इमरान खान यांची सत्ता गेल्यास पंतप्रधान कोण? शाहबाज शरीफ यांचं नाव आघाडीवर

Ajmal kasab : अजमल कसाबचा पत्ता भारताला नवाज शरीफ यांनी दिला, पाकिस्तानी मंत्र्याचा खळबळजनक दावा

Imran Khan: शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार, इमरान खान यांच्या भेटीला आर्मी चीफ, ISI चे डीजी; पाकिस्तानात राजकीय घडामोडींना वेग

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.