AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिजिटल इकोनॉमीसाठी नेपाळला भारताची मदत… जाणून घ्या काय होईल फायदा

भारतात तयार झालेले Rupay Card नेपाळने आपल्या देशात लॉन्च केले आहे. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा शनिवारपासून भारत भेटीवर आहेत. Rupay Card च्या लॉन्चिंगदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले, की रुपे कार्डाची ही सुरुवात नेपाळ व भारताच्या आर्थिक कनेक्टिव्हिटीसाठी एक नवा अध्याय रचण्यास मदत करणार आहे.

डिजिटल इकोनॉमीसाठी नेपाळला भारताची मदत... जाणून घ्या काय होईल फायदा
डिजिटल इकोनॉमीसाठी नेपाळला भारताची मदतImage Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 12:59 PM
Share

नेपाळ हा भारताचा शेजारील देश आहे. नेपाळ व भारताचे पूर्वीपासून जवळचे धार्मिक व सांस्कृतिक नाते राहिले आहे. जवळपास दोन्ही देशांची संस्कृतीदेखील एकच असल्याने भारत व नेपाळचे संबंध फार जुने आहेत. त्यामुळे आपल्या या लहान शेजारी देशाच्या आर्थिक विकासासाठी भारताने नेहमीच मोठ्या भावाची भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही देशांचे संबंध अजून घट्ट करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा (Sher Bahadur Deuba) यांनी स्वदेशी विकसित रुपे कार्ड (Rupay Card) नेपाळमध्ये लॉन्च केले आहे. यातून दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय पर्यटनाला मजबूत करण्यास मदत होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या सोबतच नेपाळ हा देश रुपे कार्ड वापरणारा चारव्या क्रमांकाचा देश बनला आहे. नेपाळशिवाय भूतान, सिंगापूर, आणि संयुक्त अरब अमिरातमध्येही रुपे कार्ड वापरले जात आहे. नेपाळचे पंतप्रधान शनिवारपासून भारत भेटीवर असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

प्रधानमंत्री मोदी आणि देउबा यांनी व्यापर, उर्जा, गुंतवूणक या क्षेत्रांमध्ये एकमेकांचा सहयोग घेउन सहकार्य करण्याचे एकमेकांना आश्‍वासन दिले. शिवाय इतर व्यापारी विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली व त्यानंतर दोघांकडून रुपे कार्डचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात पीएम मोदी यांनी सांगितले, की नेपाळमध्ये रुपे कार्डची सुरुवात झाल्यामुळे दोन्ही देशांमध्ये नवीन वित्तीय संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे.

‘पेमेंट इकोसिस्टम’ मजबूत होईल

या योजनेशी संबंतील लोकांनी सांगितले, की नेपाळमध्ये कार्डाची सुरुवात ‘टेक्नोलोजी इनोव्हेशन’च्या रुपात उपयोगात येण्यास मदत होणार आहे. या सोबतच वित्तीय सुविधा आणि सशक्तीकरणासोबत यामातून एक नवीन माध्यम निर्माण होणार आहे. रुपे कार्डच्या माध्यमातून पेमेंट इकोसिस्टमला चांगली चालना मिळणार असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, या आधी नेपाळने भारतीय डिजिटल ट्रांजेक्शन सिस्टीम म्हणजेच युपीआयचादेखील वापर केला होता. ही प्रणाली वापरणारा भारताशिवाय नेपाळ हा पहिला देश ठरला आहे. याबाबत ‘भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम’ने सांगितले, की नेपाळ भारताची युपीआई सिस्टम वापरणारा पहिला देश बनला आहे. दरम्यान, ‘एनपीसीआई’ची आंतरराष्ट्रीय शाखा एनपीसीआई इंटरनेशनल पेमेंट्‌स लिमिटेडने नेपाळमध्ये सेवा देण्यासाठी पेमेंट्‌स सर्व्हीस (जीपीएस) आणि मनम इन्फोटेकसोत हातजोडणी केली आहे. मनम इन्फोटेक नेपाळमध्ये युनिफाईड पेमेंट्‌स इंटरफेसला लागू करणार आहे.

युपीआईचा नेपाळला मिळेल महत्वपूर्ण फायदा

जीपीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश प्रसाद मनंधर यांनी सांगितले की, युपीआई सेवाने भारताच्या डिजिटल सेवा क्षेत्रात फारमोठी कामगिरी बजावली आहे. आम्हाला अशी आशा आहे, की युपीआई नेपाळमध्ये डिजिटल वित्तीय प्रणालीत बदल करुन एक सकारात्मक प्रभाव निर्माण करेल.

IPL 2022, MI vs RR: तिलक वर्माचा षटकार, चेंडू थेट कॅमेरामनच्या डोक्यावर आदळला, पाहा Video

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर हनुमान चालिसा सुरू, घाटकोपरपासून सुरूवात; मुंबईचं राजकीय वातावरण तापणार?

Chandrapur- सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरीमध्ये पडली उल्कासदृश्य वस्तू, नागरिकांमध्ये संभ्रम

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.