पार्थ पवारांच्या प्रचारासाठी लहान भाऊ जय पवारही मैदानात

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांनी आपला प्रचार धडाक्यात सुरु केला असताना, त्यांच्या मदतीसाठी लहान भाऊ जय पवारही मदतीला धावला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ यांच्या प्रचारासाठी जय पवार यांनीही मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. मावळ लोकसभा मतदारसंघाकडे सध्या संपूर्ण […]

पार्थ पवारांच्या प्रचारासाठी लहान भाऊ जय पवारही मैदानात
Follow us on

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांनी आपला प्रचार धडाक्यात सुरु केला असताना, त्यांच्या मदतीसाठी लहान भाऊ जय पवारही मदतीला धावला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ यांच्या प्रचारासाठी जय पवार यांनीही मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

मावळ लोकसभा मतदारसंघाकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पावर हे येथून रणांगणात उतरले आहेत. पार्थ पवार यांनी उमेदवारी जाहीर होताच, राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मतदारासंच्या गाठीभेटी सुरु केल्या. लहान-मोठ्या सभा, मेळावेही घेण्यास सुरुवात केली आहे. याच प्रचाराचा भाग म्हणून पार्थ पवार यांनी आज पिपंपरी चिंचवड परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी पार्थ पवार यांच्या सोबतीला त्यांचे लहान बंधू जय पवार हेही हजर होते.

पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करत आहेतच. त्याचसोबत, आई सुनेत्रा पवार, वडील अजित पवार हेही ठिकठिकाणी प्रचारात सामिल होत आहेत. त्यांच्या जोडीला आता पार्थ पवार यांचा लहान भाऊ जय पवारही उतरला आहे. त्यामुळे मावळमधील प्रचाराला आता वेगळीच रंगत आली आहे.

रायगड आणि पुणे अशा दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण इथून शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादीकडून पार्थ पवार हे लढत देणार आहेत. पार्थ पवार हे ‘पवार’ असल्याने त्यांच्या लढतीबद्दल कुतुहल निर्माण झालं आहे. पार्थ यांची राजकीय एन्ट्री ‘लोकसभेचा खासदार’ म्हणून होणार का, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

23 एप्रिल रोजी मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. निकाल 23 मे रोजी सर्व टप्प्यांचा एकत्रित लागेल, तेव्हाच लागणार आहे.