Rajya Sabha Election 2022: तुम्ही सगळे एकदा विश्रांती घेऊन या, राज्यसभेच्या लांबलेल्या निकालावर जयंत पाटलांचं तीन प्रश्नावर दिलखुलास उत्तर

| Updated on: Jun 10, 2022 | 9:30 PM

Rajya Sabha Election 2022: निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आणि रिटर्निंग ऑफिसरने स्पष्टपणे यात काहीच चूक नाही असं स्पष्टपणे सांगितलं. तरीही भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

Rajya Sabha Election 2022: तुम्ही सगळे एकदा विश्रांती घेऊन या, राज्यसभेच्या लांबलेल्या निकालावर जयंत पाटलांचं तीन प्रश्नावर दिलखुलास उत्तर
तुम्ही सगळे एकदा विश्रांती घेऊन या, राज्यसभेच्या लांबलेल्या निकालावर जयंत पाटलांचं तीन प्रश्नावर दिलखुलास उत्तर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यसभेचं मतदान (Rajya Sabha Election) होऊन चार तास उलटले तरी मतमोजणी अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबतची चर्चा सुरू असून आयोग काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीचे (ncp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मतमोजणीबाबतचा निर्णय आता येईल की उद्या त्यावर निर्णय येईल, असा सवाल जयंत पाटील यांना करण्यात आला आहे. त्यावर जयंत पाटील यांनी अत्यंत हजरजबाबी प्रतिक्रिया दिली. तुम्ही सर्वजण एकदा विश्रांती घेऊन या. आपण आयोगाचा निर्णय झाल्यावर याच ठिकाणी भेटू, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. त्यावेळी एकच खसखस पिकली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय कधी येईल हे सांगता येत नाही. त्याबाबतची कल्पना नाही, असंही पाटील यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.

निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आणि रिटर्निंग ऑफिसरने स्पष्टपणे यात काहीच चूक नाही असं स्पष्टपणे सांगितलं. तरीही भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. आता त्यावर निवडणूक आयोग लवकरच निर्णय देतील. महाविकास आघाडीने जे आक्षेप घेतले त्याची शहानिशा दिल्लीत होईल. विलंब का होत आहे माहीत नाही, असं पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मतपेटी बंद झाल्यावर…

एकंदरीत निवडणूक प्रक्रियेबाबतही त्यांना सवाल केला. त्यावरही त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं. 4 वाजता व्होटिंग संपली. एवढा उशीर झाला तरी मोजणी केली नाही. एकदा बॅलेट बॉक्समध्ये मतपत्रिका गेली तर पुन्हा त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. निवडणूक निर्णय मतपेटीत बंद झाल्यावर काऊंटिंगला परवानगी न देणं, इतका विलंब लावणं योग्य नाही. ते आज निर्णय देणार की उद्या देणार हे कसं सांगणार? आम्ही वाट बघतो. निर्णय देणारे दिल्लीत आहेत. मतमोजणी लवकर व्हावी हा आग्रह आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तेव्हा ते दिल्लीत धाव घेतात

भाजप नेत्यांनी थेट दिल्लीत धाव घेतल्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी भाजपची खिल्ली उडवणारं उत्तर दिलं. महाराष्ट्रात काही आशा संपतात तेव्हा ते दिल्लीत धाव घेतात. दिल्लीत जायचं आणि न्याय मिळवायचा ही त्यांची एक सवय झाली आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

त्यावर विधान करणं योग्य नाही

निवडणूक आयोग मुद्दाम वेळ घेत आहे का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. निर्णय घेणाऱ्यांबद्दल काही विधाने करणं योग्य नाही, असं सांगत त्यांनी या प्रश्नावर अधिक भाष्य करणं टाळलं. आम्हाला विजयाची खात्री आहे. त्यावर आधीच बोलणं योग्य नाही, असंही ते म्हणाले.