उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याच्या थेट राजीनाम्याने एकच खळबळ!

कतेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकूण सहा खासदारांनी बंड करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. ठाकरेंच्या या बंडखोर गटाच्या शिवसेना विलिनीकरणालाही अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे. ठाकरेंना बसलेला हा जबर धक्का आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी ठाकरे आता पुन्हा एकदा कामाला लागले आहेत.

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याच्या थेट राजीनाम्याने एकच खळबळ!
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 03, 2026 | 4:34 PM

Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आपली राजकीय सोय आणि करिअर लक्षात घेऊन नेतेमंडळी आजकाल बिनदिक्कत पक्षांतर करताना दिसत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर तर पक्षांतराचे हे वारे आणखी जोमाने वाहू लागले आहे. नुकतेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकूण सहा खासदारांनी बंड करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. ठाकरेंच्या या बंडखोर गटाच्या शिवसेना विलिनीकरणालाही अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे. ठाकरेंना बसलेला हा जबर धक्का आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी ठाकरे आता पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. ते लोकांशी जास्तीत जास्त संपर्क करून पक्षाचा विस्तार कसा होईल, यावर काम करत आहेत. असे असतानाच आता कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे.ठाकरेंच्या विश्वासू महिला नेत्याने राजीनामा दिला आहे.

नेमकं काय घडलं? नवी माहिती काय?

सध्या कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर राणे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. वैशाली दरेकर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे हे उमेदवार होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता याच वैशाली दरेकर यांनी आपल्या जिल्हा महिला संघटक पदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनामा देताना काय कारण दिले?

वैशाली दरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा हा वैयक्तिक कारणांमुळे देत असल्याचे सांगितले आहे. माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मी वेळ देऊ शकत नाहीये, असंही त्या म्हणाल्या आहेत. मी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला असला तरीही मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सदस्या म्हणून कार्यरत राहणार आहे, असं स्पष्टीकरण वैशाली दरेकर यांनी दिले. दरेकर यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्या भविष्यात नेमका काय निर्णय घेणार? त्यांचे आगामी राजकारण नेमके कसे असेल? असेही अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us