KDMC Election 2022 : कल्याण-डोबिवलीत यंदा शिंदेंसाठी पेपर सोपा, मात्र ठाकरेंचं काय होणार?, वॉर्ड क्रमांक 41 कुणाचा?

आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतली चुरशीची लढत पाहायला मिळत आहे, ही चुरस आणखी वाढणार आहे. तर यावेळी वॉर्डची रचना आणि आरक्षणेही बदलली आहेत.

KDMC Election 2022 : कल्याण-डोबिवलीत यंदा शिंदेंसाठी पेपर सोपा, मात्र ठाकरेंचं काय होणार?, वॉर्ड क्रमांक 41 कुणाचा?
कल्याण-डोबिवलीत यंदा शिंदेंसाठी पेपर सोपा, मात्र ठाकरेंचं काय होणार?, वॉर्ड क्रमांक 41 कुणाचा?
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 06, 2022 | 3:19 PM

कल्याण : राजात मोठं सत्तांतर झालं (Cm Eknath Shinde) आणि त्यानंतर काही दिवसातच राज्यातल्या बड्या महानगरपालिकांच्या निवडणुका (Municipal Corporation Election 2022) लागल्या. त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, ठाणे  महानगरपालिकेचे निवडणूक, तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचाही (KDMC Election 2022) नंबर लागला. वास्तविकता गेल्या अडीच वर्षांपासून ही निवडणूक रखडलेले आहे. 2020 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मुदत संपली होती. मात्र कोरोना काळात निवडणूक या पुढे ढकलत गेल्या आणि त्यातच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मुहूर्तही आला नाही. मात्र आता कोरोनाच्या चारही लाटा कमी झाल्याने निवडणुका या सुरळीत पार पडत आहेत. त्यातच आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतली चुरशीची लढत पाहायला मिळत आहे, ही चुरस आणखी वाढणार आहे. तर यावेळी वॉर्डची रचना आणि आरक्षणेही बदलली आहेत.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

चुरस वाढण्याचं कारण काय?

कल्याण डोंबिवलीची महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे हे संपूर्ण राज्याचे लक्ष  लागलेलं आहे. त्याला कारण ठरलय राज्यात झालेला सर्वात मोठं सत्तांतर, एकनाथ शिंदे यांचा या महानगरपालिकेवर सर्वात मोठा होल्ड आहे. तर श्रीकांत शिंदे यांचा हा बालेकिल्लाच मानला जातो. त्यामुळे सहाजिकच या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचा बोलबाला राहणार आहे. तर भाजपसाठी एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत आले आणि हा पेपर थोडा सोपा झाला आहे.

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

ठाकरेंसाठी पेपर कठीण

मात्र महानगरपालिका निवडणुकीची ही अग्निपरीक्षा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी कठीण असणार आहे. या ठिकाणी शिवसेनेला पूर्णपणे खिंडार पडलेला असताना शिवसेनेला पुन्हा जोमाने उभा करण्याचं आव्हान, या दोन्ही नेत्यांसमोर असणार आहे, तसे प्रयत्नही सध्या आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू आहेत. तर दुसरीकडून एकनाथ शिंदे आपला बालेकिल्ला राखण्यासाठी जोर लावत आहे, त्यामुळे ही लढत आणखी रंगतदार होत आहे.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

वॉर्डमधील आकडेवारी काय सांगते?

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 41 च्या आकडे वरती नजर टाकल्यास काही गोष्टी आपल्या सहज लक्षात येतात. त्यात या वॉर्ड मध्ये एकूण लोकसंख्या ही 35 हजार 84 आहे. यात 4106 अनुसूचित जातीचे लोक आहेत. तर 1198 अनुसूचित जमातीचे मतदार असणार आहेत, प्रत्येक ठिकाणची जातीय समीकरणे ही निवडणुकीवर नक्कीच परिणाम घडवत असतात तसेच स्थिती या ठिकाणी दिसणार आहे. शिवसेनेत पडलेली उभी फूट यावेळच्या महानगरपालिका निवडणुकींची समीकरणं पूर्णपणे बदलून टाकत आहे. त्याचा थेट परिणाम हा निकालावर होणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें