AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘उद्धव ठाकरे, काँग्रेसला मतदान करा असे मशिदीतून फतवे’, राज ठाकरेंचा सर्वात मोठा दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत मोठा दावा केला आहे. मशिदीमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे दिले जात असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच ठाकरेंनीही एक फतवा काढला आहे. काय आहे तो फतवा जाणून घ्या.

'उद्धव ठाकरे, काँग्रेसला मतदान करा असे मशिदीतून फतवे', राज ठाकरेंचा सर्वात मोठा दावा
राज ठाकरे यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा
| Updated on: May 10, 2024 | 11:04 PM
Share

लोकसभा निवडणुकीची पुण्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रचारसभा पार पडली. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी घेतलेल्या सभेत राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मस्जिदमधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान होण्यासाठी फतवा काढल्याचा सर्वात मोठा दावा राज ठाकरेंनी केला.

राज ठाकरेंचा मोठा दावा

निवडणुकीच्या तोंडावर फतवे काढत आहेत. मुस्लिम समाज तुमची घरची गुरढोरं आहेत का? त्यांनाही समजतंय काय राजकारण चाललं आहे. कोण आपल्याला वापरून घेत आहे ते. निवडणुकीच्या तोंडावर फतवे काढले जात आहेत की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, काँग्रेसला मतदान करा. जर मस्जिदमधून मौला असे फतवे काढत असतील तर आज राज ठाकरे फतवा काढत आहे. भापजचे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उमेदवारांना भरघोस मतदान करा. काँग्रेसच्या लोकांना मतदान करण्याच्या दृष्टीकोनातून अनेक लोकांची जी काही चुळबूळ आहे कशासाठी तर दहा वर्षामध्ये यांना तोंड वरती काढता आलं नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

अनेक चांगले मुसलमान आहेत. जे आपापल्या कष्टाने काम करत आहे त्यांचा काही विषय नाही. पण काही वाहियात आहेत ज्यांना इथे धार्मिक धुमाकूळ घालायचा आहे. ज्यांना याआधी डोकं वर काढता आलं नाही. त्यांना काँग्रेसच्या माध्यामातून डोकं वर काढायचा प्रयत्न करत आहेत म्हणून हे फतवे निघत आहेत. उदया यांच्या हातात काही गोष्टी गेल्या चुकून तर या रस्त्यावर फिरणं कठीण करतील. मला आठवतोय ८०-९० चा काळ, उन्माद सुरू होता उन्नाद या सगळ्या गोष्टींचा शेवट होता बाबरी मस्जिदचा ढाचा पडणं. मला वाटलं नव्हतं परत राम मंदिर देशात बनेल पण नरेंद्र मोदी यांच्यामुळे ते शक्य झाल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीपातीचं राजकारण- राज ठाकरे

शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. हे जातीपातीचं विष 1999 सालापासून कालवायला सुरूवात झाली आहे. माझे अजित पवारांबद्दल अनेक मतभेद असतील. पण अजित पवारांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडल गेला होता. अनेकांना वाटलं नितीन गडकरी यांचे नातेवाईक आहेत. त्यानंतर जेम्स लेन हे प्रकरण आणलं गेल्याचं राज ठाकरे म्हणाले.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.