Nitesh Rane Celebration : कणकवली येथे मंत्री नितेश राणेंकडून विजयाचा जल्लोष
मुळशीच्या पिरंगुटमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल पवळे विजयी झाले आहेत. लातूरमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली, तर सिंधुदुर्ग, धाराशिव आणि सोलापूरमध्ये भाजपने प्रभावी कामगिरी केली आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजप 18 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून, मंत्री नितेश राणे यांनी विजयोत्सव साजरा केला.
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 च्या निकालांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट गणातून पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल पवळे विजयी झाले आहेत.
लातूर जिल्ह्यात काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. दुसरीकडे, कणकवलीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजयाचा जल्लोष साजरा केला. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने आपला झेंडा फडकवला असून, 18 जागांवर आघाडी घेतली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला येथे खातेही उघडता आले नाही. यामुळे सिंधुदुर्गमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
धाराशिव जिल्ह्यात भाजप सहा, शिवसेना पाच, राष्ट्रवादी काँग्रेस तीन, काँग्रेस चार आणि ठाकरेंची शिवसेना चार जागांवर आघाडीवर आहेत. धाराशिवमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली असून, ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत 17 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस आठ जागांवर विजयी झाली आहे, तर महाविकास आघाडीला इथे खातेही उघडता आले नसल्याचे वृत्त आहे.
Published on: Feb 09, 2026 12:27 PM
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
