Ketaki Chitale : केतकी चितळेला आणखी एक मोठा दणका, ताबा रबाळे पोलिसांकडे, 2020 मधील ॲट्रॉसिटी प्रकरण आता भोवलं

| Updated on: May 19, 2022 | 5:31 PM

आज केतकीच चितळेचा ताबा हा रबाळे पोलिसांनी घेतला आहे. 2020 मध्ये केतकीवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होता तेच प्रकरण केतकीला आता भोवलं आहे. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गेल्या चार दिवसांपासून ती ठाणे पोलिसांच्या ताब्यात होती.

Ketaki Chitale : केतकी चितळेला आणखी एक मोठा दणका, ताबा रबाळे पोलिसांकडे, 2020 मधील ॲट्रॉसिटी प्रकरण आता भोवलं
अभिनेत्री केतकी चितळे
Image Credit source: instagram
Follow us on

नवी मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketaki Chitale) पाय आता आणखी खोलात गेला आहे. कारण केतकीला आणखी एक मोठा दणका बसलाय. आज केतकीच चितळेचा ताबा हा रबाळे पोलिसांनी घेतला आहे. 2020 मध्ये केतकीवर ॲट्रॉसिटी गुन्हा (Atrocity Case) दाखल होता तेच प्रकरण केतकीला आता भोवलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गेल्या चार दिवसांपासून ती ठाणे पोलिसांच्या ताब्यात होती. गेल्या अनेक वर्षांपासून केतकी चितळे हे नाव सतत वादात आहे. केतकीने आतापर्यंत फक्त शरद पवार यांच्याबाबतच आक्षेपार्ह पोस्ट केली नाही तर तिने अशा अनेक वादग्रस्त पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे केतकीवर आधीही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. आता शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीवर तब्बल 17 गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आता जुनं अॅट्रोसिटीचं प्रकरण बाहेर आल्यामुळे तिची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

काय आहे नवी मुंबईतील अॅट्रोसिटी प्रकरण?

केतकी चितळे हिने 1 मार्च 2020 रोजी फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप तिच्यावर आहे, तसेच केतकीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क’, आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो”. अशी पोस्ट केतकीने केली आहे. याच प्रकरणात तिच्यावर तेव्हा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आता त्या गुन्ह्याच्या तपासाला वेग आणला आहे.

आणखी कोणते पोलीस ताब्यात घेणार?

केतकीवर फक्त ठाणे नवी मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर गुन्हे दाखल झाल्याने आता इतर ठिकाणचे पोलीसही केतकीचा ताबा मागत आहे. गोरेगाव पोलिसांकडूनही केतकीचा ताबा घेण्यासाठी सचोटिने प्रयत्न सुरू होते. शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट ते आता अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात पोलिसांकडे ताबा यामुळे केतकी प्रकरण आता वेगळ वळण घेताना दिसून येत आहेत. केतकीची ही जेलवारी आणखी किती दिवस चालणार? याबाबत सध्या तरी सांगणं कठीण होऊन बसलंय. आता नवी मुंबई पोलीस यात काय अधिकृत माहिती देतात तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा