AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : क्रिकेट मॅच रद्द झाल्यास लोकांचे पैसे वाया ? तिकीटाची रक्कम मिळते की नाही; काय आहे नियम ?

Lucknow T20I Cancelled : धुक्यामुळे एखादा सामना किंवा मॅच रद्द झाल्याची घटना क्वचितच घडते. पण काल (17 डिसेंबर) लखनऊमध्ये असंच काहीस घडल्याचं पहायला मिळालं. आता प्रश्न असा आहे की लोकांनी तिकिटांसाठी जे पैसे खर्च केले, त्याचं काय होणार ? ते पैसे परत मिळणार की नाही ?

IND vs SA : क्रिकेट मॅच रद्द झाल्यास लोकांचे पैसे वाया ? तिकीटाची रक्कम मिळते की नाही; काय आहे नियम ?
मॅच रद्द झाल्यावर तिकीटाचे पैसे मिळणार की नाही ?Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Dec 18, 2025 | 12:02 PM
Share

Lucknow T20 Match : लखनौ येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आला.  लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर भारत वि. दक्षिण आफ्रिकेच्या ( India vs South Africa) चौथ्या टी-20 सामन्यात (T 20 match) धुकं इतकं दाट होतं की एकही चेंडू खेळणं तर दूरच राहिलं, साधा टॉसही होऊ शकला नाही. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. मात्र अशा परिस्थितीत सर्वांच्या मनात एक प्रश्न हमखास आला असेल तो म्हणजे, प्रेक्षकांच्या पैशांचं काय झालं असेल ? त्याना तिकीटांचे पैसे मिळतील की ते वाया जाणारा ? याबद्दल BCCIचे नियम काय आहेत ?

काल लखनौमध्ये, धुके दूर होऊन सामना पुन्हा सुरू होईल या आशेने तीन तास वाट पाहावी लागली. पण, कोणताही उपाय न सापडल्याने, अखेर तो सामनाच रद्द करण्यात आला, ज्यामुळे चाहते निराश झाले आणि घरी परतले.

मॅच रद्द झाल्यास तिकीटांचे पैसे परत मिळण्याबाबत काय आहेत नियम ?

आता प्रश्न असा आहे की, तिकिटांच्या परतफेडीचे काय? चाहत्यांना त्यांचे पैसे मिळतील का? याबाबत बीसीसीआयचे दोन नियम आहेत. पहिल्या नियमात असे म्हटले आहे की जर एकही चेंडू न टाकता सामना रद्द झाला तर तिकीट बुकिंग शुल्क कापून उर्वरित पैसे क्रिकेट चाहत्यांना परत केले जातील. पण दुसऱ्या नियमात असे म्हटले आहे की जर सामना सुरू झाला आणि नंतर हवामानामुळे रद्द झाला तर तिकिटाचे पैसे परत केले जाणार नाहीत.

लखनऊ T20 रद्द, लोकांचे पैसे झाले रद्द ?

तिकिटांच्या परतफेडीबाबत बीसीसीआयचे वर दिलेले नियम जाणून घेतल्यानंतर, आता लखनौमधील क्रिकेट चाहत्यांना निराश होण्याची गरज नाही. सामना पाहू न शकल्याने ते निराश झाले असले तरी त्यांचे पैसे सुरक्षित आहेत. ते वाया गेले नाहीत कारण लखनऊमधील T20 मॅच ही एकही चेंडू न टाकताच रद्द झाली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना त्यांचे पैसे परत मिळतील.

पण क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या तिकिटांचे पैसे कधी परत मिळतील याची माहिती राज्य क्रिकेट असोसिएशन आणि अधिकृत तिकीट भागीदारांकडून लवकरच शेअर करण्यात येईल.

IND vs SA T20 सीरीजचं काय झालं ?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने पहिल्या चार सामन्यांनंतर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. कटकमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मुल्लानपूरमध्ये दुसरा टी-20 सामना जिंकला होता. त्यानंतर धरमशाला येथे झालेला तिसरा टी-20 सामना भारताने जिंकत 2-1 अशी आघाडी घेतली. काल लखनौमध्ये होणारा चौथा टी-20 सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघामध्ये आता 5 वा शेवटचा टी-20 सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यात भारत जिंकला तर ही मालिका भारतीय संघ 3-1 ने जिंकेल मात्र दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवल्यास ही टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटेल.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी