AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपा आज घेणार मोठा निर्णय, पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर अखेर…

राज्यातील 29 महापालिकांचा निवडणुका झाल्या असून सध्या महापाैर पदावरून चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत आहे. पुणे महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. आज महापाैर पदाचे नाव फायनल होईल, असे सांगितले जात आहे.

भाजपा आज घेणार मोठा निर्णय, पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर अखेर...
Pune Municipal Corporation mayor
| Updated on: Feb 03, 2026 | 7:40 AM
Share

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून महापाैरपदासाठी आरक्षण सोडत देखील निघाली. मात्र, अजूनही महापाैरपदावरून रस्सीखेच बघायला मिळत आहे. पुणे महापालिका भाजपाच्या हाती गेली. मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली, उल्हासनगर अशा महत्वाच्या महापालिकांवर भाजपासह शिवसेना शिंदे गटाने मोठा विजय मिळाला. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने युती म्हणून या निवडणुका लढवल्या होत्या. राज्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची साथ सोडत शरद पवार यांच्या गटासोबत महापालिका निवडणुका लढल्या. मात्र, अजित पवार यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले नाही. मुंबईहून बारामतीकडे निघाले असता अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण धुरा त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हातात आहे.

दुसरीकडे पुणे महापालिकेचे महापाैरपद पदरात पाडून घेण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. भाजपाकडून तीन नावे अंतिम अर्ज भरण्यापूर्वी जाहीर होणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत तीन नावे निश्चित करण्यात आली. आज महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वीच भाजपाकडून अंतिम नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजपाने 119 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पालिकेत भाजपाचाच महापौर होणार आहे हे निश्चित झालं आहे. सर्वसाधारण महिला गटासाठी महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपामधील सर्वसाधारण गटातील इच्छुक महिला नगरसेवकांकडून जोरदार मोर्चा बांधणी सुरू झाली होती. आज महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

यामध्ये तीन महिला नगरसेवकांमध्ये खडकवासला मतदारसंघातून वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे तर पर्वती मतदारसंघातून मानसी देशपांडे यांचे नाव आघाडीवर आहे. आज भापजाकडून अंतिम नाव जाहीर केले जाईल. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या महापाैर पदासाठी रवी लांडगे यांचे नाव फायनल झाले असून त्यांनी अर्ज देखील भरला आहे. सलग दोन वेळा रवी लांडगे हे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान