मुलाच्या चौकशीनंतर किरीट सोमय्या आक्रमक, कथित जमीन घोटाळा प्रकरणात कर्जत तहसीलदारला भेटणार

| Updated on: Jan 31, 2021 | 3:30 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात कर्जतमधील जमिनीची अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप सोमय्या यांचा आहे. त्या प्रकरणात आता आपण कर्जत तहसीलदाराची भेट घेणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

मुलाच्या चौकशीनंतर किरीट सोमय्या आक्रमक, कथित जमीन घोटाळा प्रकरणात कर्जत तहसीलदारला भेटणार
किरीट सोमय्या आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांची एका जुन्या वादातून पोलिस चौकशी झाली आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात कर्जतमधील जमिनीची अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप सोमय्या यांचा आहे. त्या प्रकरणात आता आपण कर्जत तहसीलदाराची भेट घेणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. ट्विटरद्वारे सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना वाद अधिक पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(Kirit Somaiya will meet the Karjat tehsildar tomorrow)

‘उद्या मी कर्जत तहसीलदारची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात कर्जत जमिनीच्या अपूर्ण माहितीचा पाठपुरावा करणार आहे’, असं ट्वीट सोमय्या यांनी केलं आहे. सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्या यांची एका जुन्या वादातून पोलिस चौकशी करण्यात आली आहे. मुलुंडच्या पोलिस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार नील सोमय्या यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पार पडली. नील सोमय्या हे भाजपचे नगरसेवक आहेत. सध्या ज्या प्रकरणात नील सोमय्या यांची चौकशी झाली, ते प्रकरण बरंच जुनं आहे. मात्र, काल पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली. या चौकशीनंतर नील सोमय्या घरी परतले. आता पुढील काळात पोलिस नील सोमय्या यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागलं आहे.

जमीन प्रकरणात सोमय्यांचे ठाकरेंवरील आरोप काय?

किरिट सोमय्या यांनी कथित जमीन खरेदी प्रकरणावरून नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोपांची मालिका सुरु केली आहे. ठाकरे कुटुंबांनी आतापर्यंत जमिनीचे 40 व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहेत. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का?, अशी प्रश्नांची सरबत्तीच किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती.

ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक यांचे संबंध काय आहेत?, ठाकरे कुटुंब आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांचे आर्थिक संबंध काय आहेत? असे सवाल सोमय्या यांनी केले. ठाकरे परिवाराने एकूण 40 जमिनींचे व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 जमिनींचे व्यवहार एकट्या अन्वय नाईकसोबत झाले आहेत. एका व्यक्तीशी जमिनीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार कसे काय झाले? असा सवाल सोमय्या यांनी केला. मी ठाकरे कुटुंबाला केवळ पाच प्रश्न विचारले आहेत. त्याची त्यांनी उत्तरं द्यावीत. महाराष्ट्रातील जनतेला या व्यवहारांची माहिती हवी आहे, असं आव्हान सोमय्या यांनी केलं होतं.

दहिसर भूखंड घोटाळा

अजमेरा बिल्डर्सनी 2 कोटी 55 लाखांना विकत घेतलेली जमीन आता मुंबई महानगरपालिका विकत घेणार आहे. मात्र, मुंबई महागनरपालिकेला या जमिनीसाठी 900 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. या व्यवहारासाठीचे 300 कोटी रुपये अजमेरा बिल्डर्सला देण्यात आले आहेत. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. आता संजय राऊत आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांमध्ये हिंमत असेल तर या आरोपांवर बोलावे, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या :

थातूरमातूर बोलू नका, सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या; राम कदम यांचं राऊतांना आव्हान

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या कथित तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

Kirit Somaiya will meet the Karjat tehsildar tomorrow