Kishori Pednekar : भाजपचे सगळे नेते ‘दूध के धुले’ आहेत, महापौर किशोरी पेडणेकरांची भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका

| Updated on: May 26, 2022 | 12:38 PM

चंद्रकात पाटील यांच्या शब्दांचा निषेध व्यक्त करते. एक जबाबदार नेते असून अनेक वेळा त्यांची जीभ महिलाबद्दल बोलताना घसरते. सर्व पक्षीय महिला घर सांभाळून पक्षाचं काम करतात असाही टोला महापौरांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

Kishori Pednekar : भाजपचे सगळे नेते दूध के धुले आहेत, महापौर किशोरी पेडणेकरांची भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका
महापौर किशोरी पेडणेकरांची भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई – “ज्या राज्यात भाजपचं (BJP) सरकार नाही, तिकडे हा त्रास सर्वांना होतोय. याचा अर्थ असा नाही, की ते गुन्हेगार आहेत आणि हे सर्व दूध के धुले आहेत” अशी टीका महापौर किशोरी पेंडणेकर (Kishori Pendnekar) यांनी भाजपच्या नेत्यांवरती केली. तसेच अनिल परब (Anil Parab) वकील आहेत, विभाप्रमुख आहेत. सर्व शिवसेना त्यांच्या सोबत आहे. ते चौकशीला योग्य सामोरे जात आहेत. ईडी काय हे लोकांना कळलं आहे असाही टोला महापौरांनी लगावला. आज सकाळपासून शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छापेमारी नंतर ईडी काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सुडाचं राजकारण लोकांना समजलं आहे

मुख्यमंत्र्यांना देखील डॅश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपकडून होत असलेलं सुडाचं राजकारण लोकांना समजलं आहे. आत्तापर्यंत अनेकदा मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर मुंबईला अस्थिर करण्याचं प्रयत्न सुरु आहे. शिवसेनेबद्दल विष पेरण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी टीका त्यांनी किशोरी पेंडणेकरांनी भाजपवरती केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आगोदर त्यांना काम करण्यापासून त्यांना अडवलं जात आहे. अनिल परब शिवसेनेचे बूस्टर आहेत, सर्वाना डोस देतील. जाधव आणि परब दोघेही योग्यपणे कारवाईला सामोरे जातील. भाजप नेत्यांना कोणत्याही प्रतिक्रिया देऊ द्या आम्ही काम करत राहू असंही त्या म्हणाल्या.

सर्व पक्षीय महिला घर सांभाळून पक्षाचं काम करतात

चंद्रकात पाटील यांच्या शब्दांचा निषेध व्यक्त करते. एक जबाबदार नेते असून अनेक वेळा त्यांची जीभ महिलाबद्दल बोलताना घसरते. सर्व पक्षीय महिला घर सांभाळून पक्षाचं काम करतात असाही टोला महापौरांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. केंद्र सरकार महाविकास आघाडीच्या नेत्यांना मुद्दाम त्रास देत असून यातून त्यांना काही सुद्धा साध्य होणार नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. विक्रांत घोटाळा सर्वात मोठा घोटाळा आहे. टॉयलेट घोटाळा लवकरचं समोर येईल. त्या संदर्भात सर्व कागपत्रे पाठवले आहेत.

हे सुद्धा वाचा

परंतु अधिकारी त्यांच्या फाईल उघडायला तयार नाही असंही त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं