AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहन डेलकरांचे कुटुंबीय हाती शिवबंधन बांधणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शिवसेना प्रवेश

मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. डेलकर हे दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार होते.

मोहन डेलकरांचे कुटुंबीय हाती शिवबंधन बांधणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शिवसेना प्रवेश
दिवंगत मोहन डेलकर
| Edited By: sagar joshi | Updated on: Oct 07, 2021 | 5:29 PM
Share

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनं राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. डेलकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी केल्या होत्या. डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव लिहिलं होतं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मोहन डेलकर यांचे कुटुंबिय आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. (late Mohan Delkar’s wife Kalaben and son Abhinav will join Shivsena)

मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. डेलकर हे दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार होते. डेलकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीत डेलकर यांच्या पत्नी शिवसेनेकडून उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आण मुलगा अभिनव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मोहन डेलकर यांची सुसाईड नोट

मरीन लाईन्स चौपाटी येथील सी ग्रीन हॉटेलमधील रूममध्ये मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. खासदार मोहन डेलकर यांनी 15 पानांची सुसाईड नोट लिहिली असून, ही नोट खासदारांसाठी असलेल्या लेटरहेडवर लिहिली असल्याचं मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

कोण होते मोहन डेलकर?

58 वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले.

डेलकरांची राजकीय कारकिर्द

मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे एकमेव विद्यमान खासदार होते

डेलकर यांची कारकीर्द कामगार संघटनेचा नेता म्हणून सुरु झाली

आदिवासी जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला

1985 मध्ये त्यांनी आदिवासी विकास संघटना सुरु केली.

1989 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले, अपक्ष म्हणून त्यांनी दादरा आणि नगर हवेली मतदारसंघात विजय मिळवला होता.

मग ते 1991 ते 1996 दरम्यान दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं.

मग 1998 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन, त्यांच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढली.

त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी पुन्हा अपक्ष लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला.

मग 2004 मध्ये भारतीय नवशक्ती पक्षाकडून ते पुन्हा लोकसभेवर गेले.

4 फेब्रुवारी 2009 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला

मग 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन, अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

2020 मध्ये मोहन डेलकर यांनी जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला होता.

इतर बातम्या :

भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा धसका का घेतला? जयंत पाटलांचा खोचक सवाल

VIDEO: भाजप-एनसीबीच्या संगमताने बॉलिवूडमध्ये भीती निर्माण करून पैसे उकळण्याचे उद्योग; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

late Mohan Delkar’s wife Kalaben and son Abhinav will join Shivsena

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?