5

खासदार मोहन डेलकर आत्महत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये चकीत करणारी माहिती

खासदार मोहन डेलकर (MP Mohan Delkar suicide post mortem report ) यांच्या आत्महत्येमध्ये चकीत करणारी माहिती समोर आली आहे.

खासदार मोहन डेलकर आत्महत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये चकीत करणारी माहिती
दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 1:25 PM

मुंबई : दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (MP Mohan Delkar Suicide) यांच्या आत्महत्येमध्ये चकीत करणारी माहिती समोर आली आहे. मोहन डेलकर यांनी सोमवारी 22 फेब्रुवारीला मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं. मात्र शवविच्छेदन अहवालात मोहन डेलकर यांनी भल्या सकाळी म्हणजेच 7-8 च्या दरम्यान आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. जर सकाळी 7-8 वाजता त्यांनी आत्महत्या केली असेल, तर त्याबाबतची माहिती समोर येण्यासाठी दुपारी 2 वाजले, हे आश्चर्यकारक आहे. (MP Mohan Delkar suicide what post mortem report says)

कारण देशातील एक खासदार भल्या सकाळी आत्महत्या करतो, मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गळफास घेतो, मात्र जवळपास 5-6 तास त्यांच्याबाबत कोणालाच पत्ता लागत नसतो, हे आश्चर्यकारक आहे. खासदारांच्या सेवेसाठी आजूबाजूला कर्मचाऱ्यांचा गोतावळा असतो. जरी खासदार झोपले असावे असा तर्क कुणी लावला असेल, तरीही दुपारपर्यंत त्यांच्यासमोर कुणीच कसं पोहोचलं नाही?

मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात

दरम्यान. खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह नातेवाईकांनी मध्यरात्री ताब्यात घेतला. डेलकर यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम काल रात्री करण्यात आलं. मात्र डेलकर यांनी काल सकाळी आत्महत्या केल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे.

पोलिसांना बोलावून दरवाजा तोडला

मुंबईत अधूनमधून येणं-जाणं असायचं. रविवारी संध्याकाळी ते मुंबईत आले होते. हॉटेल सी ग्रीनमध्ये ते उतरले होते. ते गाडी घेऊन आले होते. त्यांच्या सोबत त्यांचा ड्रायव्हरही होता. सोमवारी दुपारी मोहन यांच्या रूमचा दरवाजा उघडला जात नव्हता. याबाबत त्याच्या ड्रायव्हरने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, तो उघडला गेला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला. यावेळी मोहन यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. यात त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांची घटनास्थळी धाव

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येबाबत माहिती मिळताच सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (IPS Vishwas Nangre Patil), अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण चौधरी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेगवेगळ्या यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. फॉरेन्सिकचे अधिकारीही आले होते. सध्या डोलकर यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टेम सुरू आहे. डोलकर यांच्या मृत्यूबाबत कळताच त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते.

संबंधित बातम्या  

खासदार मोहन डेलकर आत्महत्येचं गूढ वाढलं; सुसाईड नोटमध्ये काय?

तब्बल सातवेळा संसदेवर, खासदार मोहन डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

(MP Mohan Delkar suicide what post mortem report says)

Non Stop LIVE Update
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..