
मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातुन राज्यात सत्तांतरानंतर पाहिलीच निवडणुक होत आहे. या निवडणुकीच्या माध्यामातून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटात लढाई सुरु आहे. निवडणुक आयोग यावर निर्णय देणार आहे. धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत कायदेतज्ञ उज्वल निकम(Ujwal Nikam) यांनी खूप मोठा दावा केला आहे.
अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेद्वारी दिली आहे. तर, अंधेरी विधानसभेची जागा भाजप लढवणार आहे. शिंदे – फडणवीस यांच्यातील बैठकीत पोटनिवडणूकीमध्ये भाजप आपला उमेद्वार उतरवणार असल्याची चर्चा आहे.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत जर शिंदे गटाने उमेदवार दिला नाही तर उद्धव ठाकरे गटाला धनुष्यबाण मिळू शकते अशी शक्यता कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी वर्तवली आहे.
शिंदे गटाने या पोट निवडणुकीत आपला उमेदवार दिला तर मात्र निवडणूक आयोगापुढे पेच निर्माण होऊ शकतो असेही उज्वल निकम.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून धनुष्यबाणावर दावा केला तर आयोग चिन्ह गोठवू शकते. निवडणूक आयोगाला सहा महिन्यांच्या आत चिन्हासंदर्भात निर्णय घेणे बंधनकारक असल्याचेही उज्वल निकम म्हणाले.
निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली. धनुष्यबाण कुणाचा? ठाकरेंचा की शिंदेंचा ? पुढची लढाई कोण जिंकणार? या सगळ्याचा निर्णय आता निवडणुक आयोगच देणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना दोन गटात विभागली आहे.