AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचे विद्यामान खासदार गॅसवर, नवीन रणनीतीमध्ये असा असणार महत्वाचा बदल

LokSabha Election 2024 | भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीसाठी नवीन रणनीती तयार केली आहे. अनेक खासदारांना संघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे. पुणे शहरात भाजपची यासंदर्भात बैठक झाली.

भाजपचे विद्यामान खासदार गॅसवर, नवीन रणनीतीमध्ये असा असणार महत्वाचा बदल
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 08, 2024 | 9:08 AM
Share

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली दि. 8 जानेवारी 2024 | भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षाकडून बैठकांचे सत्र सुरु आहे. सर्व्हे केले जात आहे. मिशन 350+ साठी मोठी रणनीती तयार केली आहे. यामुळे भाजपच्या विद्यामान खासदार गॅसवर आले आहे. नवीन धोरणानुसार भाजप जास्तीत जास्त तरुण उमेदवारांना निवडणुकीत मैदानात उतरवणार आहे. त्यासाठी 40 ते 55 वर्षाच्या उमेदवारांना भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास 145 पेक्षा जास्त तरुण चेहऱ्यांना भाजप संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिला. ज्या विद्यमान खासदारांचे भाजप तिकीट कापणार त्यांना पक्षसंघटनेत जबाबदारी देणार आहे.

पुणे शहरात बैठक, रणनीती निश्चित

भाजपची रविवारी पुणे शहरात बैठक झाली. या राष्ट्रीय बैठकीत संघटनात्मक चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली. यावेळी रामजन्मभूमी सोहळा, सुपर वॉरियर्स यासह विविध उपक्रमांच्या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. या बैठकीबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. बैठकीला राष्ट्रीय संघटक सरचिटणीस बी एल संतोष, सहसंघटक मंत्री शिव प्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन उपस्थितीत होते. राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच बैठकीचे निमंत्रण दिले होते. भाजपकडून सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका घेणार आहे. दोन बैठका घेऊन उमेदवारांसंदर्भात चर्चा होणार आहे.

महायुतीची तयारी सुरु

लोकसभा निवडणुकीला यवतमाळ जिल्ह्यात महायुती लागली कामाला आहे. महायुतीतील जिल्ह्यातील प्रमुख एकत्रितपणे घेणार महायुतीचे समन्वय मेळावे सुरु झाले आहे. पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी आ. मदन येरावार ,राष्ट्रवादी चे इंद्रनील नाईक ,आ अशोक उईके जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार राहणार प्रत्येक मेळाव्याला उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या विरोधात एकीचे बळ महायुती दाखविणार आहेत. संजय राठोड आणि भावना गवळी एकाच व्यासपीठावर यामाध्यमातून एकत्र आले.

Follow Us
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?