विधानसभेची आयपीएलसारखी स्थिती, उमेदवार तोच, फक्त पक्ष वेगळा!

| Updated on: Oct 21, 2019 | 7:37 AM

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. 2014 मध्ये ज्यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला, त्यापैकी बहुतेक जण पुन्हा एकदा रिंगणात आहेत.

विधानसभेची आयपीएलसारखी स्थिती, उमेदवार तोच, फक्त पक्ष वेगळा!
Follow us on

मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. 2014 मध्ये ज्यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला, त्यापैकी बहुतेक जण पुन्हा एकदा रिंगणात आहेत. पण पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. जे आमदार निवडून आले ते आता त्याच पक्षात आहेत असं नाही. अनेक आमदारांनी पक्ष बदलून नव्या पक्षात प्रवेश केला आहे.

त्यामुळे मतदारसंघ तोच, उमेदवारही तोच, पण यंदा पक्ष वेगळा असं काहीसं चित्र आहे. यामध्ये अनेक बडी नावं आहेत. जसे राधाकृष्ण विखे पाटील पूर्वी काँग्रेसमध्ये होते, आता भाजपकडून त्याच मतदारसंघातून लढतील.

कोणी कोणी पक्ष बदलला?

 धुळे शहर, धुळे – अनिल गोटे (भाजप) – आता आघाडीत सामील

शिरपूर, धुळे – काशिराम पावरा (काँग्रेस) – आता भाजपच्या तिकीटावर

अमळनेर, जळगाव – शिरीष चौधरी (अपक्ष) – आता भाजपच्या तिकीटावर

गोंदिया, गोंदिया – गोपालदास अग्रवाल (काँग्रेस) – आता भाजपच्या तिकीटावर

सिल्लोड, औरंगाबाद – अब्दुल सत्तार (काँग्रेस) – आता शिवसेनेच्या तिकीटावर

इगतपुरी, नाशिक – निर्मला गावित (काँग्रेस) – आता शिवसेनेच्या तिकीटावर

बोईसर, पालघर – विलास तरे (बहुजन विकास आघाडी) – आता शिवसेनेच्या तिकीटावर

शहापूर, ठाणे – पांडुरंग बरोरा (राष्ट्रवादी) – आता शिवसेनेच्या तिकीटावर

वडाळा, मुंबई – कालिदास कोळंबकर (काँग्रेस) – आता भाजपच्या तिकीटावर

अकोले, अहमदनगर – वैभव पिचड (राष्ट्रवादी) – आता भाजपच्या तिकीटावर

शिर्डी, अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील (काँग्रेस) – आता भाजपच्या तिकीटावर

बार्शी, सोलापूर – दिलीप सोपल (राष्ट्रवादी) – आता शिवसेनेच्या तिकीटावर

पंढरपूर, सोलापूर – भारत भालके (काँग्रेस) – आता राष्ट्रवादीच्या तिकीटावर

माण, सातारा – जयकुमार गोरे (काँग्रेस) – आता भाजपच्या तिकीटावर

सातारा, सातारा – शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी) – आता भाजपच्या तिकीटावर

गुहागर, रत्नागिरी – भास्कर जाधव (राष्ट्रवादी) – आता शिवसेनेच्या तिकीटावर

कणकवली, सिंधुदुर्ग – नितेश राणे (काँग्रेस) – आता भाजपच्या तिकीटावर