Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या 36 पैकी 21 जिल्ह्यांना एकही मंत्रिपद नाही! ‘या’ 2 जिल्ह्यांना एकापेक्षा जास्त मंत्रिपदं, जाणून घ्या तुमच्या जिल्हाची माहिती

| Updated on: Aug 09, 2022 | 12:10 PM

विशेष म्हणजे 15 पैकी दोन जिल्ह्यांवर शिंदे-फडणवीस सरकार मेहेरबान असल्याचं आता झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातही दिसून आलंय.

Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या 36 पैकी 21 जिल्ह्यांना एकही मंत्रिपद नाही! या 2 जिल्ह्यांना एकापेक्षा जास्त मंत्रिपदं, जाणून घ्या तुमच्या जिल्हाची माहिती
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सराकरचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अखेर झाला आहे. गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त दिवसांनी हा मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet News) विस्तार पार पडला. बहुप्रतिक्षीत अशा या मंत्रिमंडळ विस्ताराने अनेक गोष्टी अधोरेखित केल्या. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना मंत्रिपद देण्यात आलं, कुणाला वगळण्यात आलं, कोणत्या जिल्ह्यांना विशेष महत्त्व दिलं गेलं, याही गोष्टींची उलगडा या मंत्रिमंडळ विस्तारातून स्पष्ट झाला आहे. त्यातून अनेक राजकीय (Maharashtra Politics) अर्थही काढले जाणार, हेही नक्कीच. म्हणून कोण्यात जिल्ह्यांना एकही मंत्रिपद देण्यात आलं नाही, कोणत्या जिल्ह्यांना एकापेक्षा जास्त मंत्रिपदं देण्यात आली आणि कुणाला दोन पेक्षापेक्षा जास्त मंत्रिपदं दिली गेली, यालाही महत्त्व प्राप्त होतं. चला तर जाणून घेऊयात, याच संदर्भातला विस्तृत आढावा.

21 जिल्ह्यांना एकही मंत्रिपद नाही!

36 पैकी 21 जिल्ह्यात एकही मंत्रिपद नाही. एका जिल्ह्यात दोन मंत्रिपदं तर एका जिल्ह्यात तर तीन मंत्रिपदं, जळगावात दोन मंत्री आणि औरंगाबादला तीन मंत्रिपदं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह आता शिंदे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री आहेत. त्यात 18 नवनिर्वाचीत मंत्र्यांचा शपथविधी राजभवनात पार पडला. दरम्यान, एकही मंत्रिपद वाट्लाला न आलेल्या जिल्यांची संख्या 21 असून एकूण उर्वरीत 15 जिल्ह्याच्या वाट्याला किमान एकतरी मंत्रिपद आलंय.

औरंगाबाद, जळगाववर विशेष ‘आत्मीयता’

विशेष म्हणजे 15 पैकी दोन जिल्ह्यांवर शिंदे-फडणवीस सरकार मेहेरबान असल्याचं आता झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातही दिसून आलंय. यामध्ये औरंगाबाद आणि जळगाव या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या तीन आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. या भाजपने औरंगाबादमधील अतुल सावे यांना मंत्रिपद दिलं असून शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागलीय.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, जळगावातही दोन मंत्रिपदं देण्यात आलीत. गिरीष महाजन आणि गुलाबराव पाटील अशा दोघांनाही मंत्रिपदं बहाल करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप नेमकं कसं होतं आणि कोणता विभाग कुणाच्या वाट्याला येतो, याची आता चर्चा रंगली आहे. महत्त्वाचं म्हणजे एकाही अपक्षाला शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात आताच्या विस्तारात तरी संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता नाराज आमदारांची मनधरणी करण्याचंही आव्हान शिंदे-फडणवीस यांच्यासमोर असणार आहे.

सविस्तार जिल्हानिहाय आढावा

  1. अकोला – एकही मंत्रिपद नाही
  2. अमरावती – एकही मंत्रिपद नाही
  3. अहमदनगर – मिळालं, विखे
  4. उस्मानाबाद – मिळालं. तानाजी सावंत
  5. औरंगाबाद – मिळालं. सत्तार, भुमरे
  6. कोल्हापूर – मिळालं, पण जिल्ह्याच्या माणसाला, आमदाराला नाही (चंद्रकांत पाटील)
  7. गडचिरोली – एकही मंत्रिपद नाही
  8. गोंदिया – एकही मंत्रिपद नाही
  9. चंद्रपूर – मिळालं, सुधीर मुनगंटीवार
  10. जळगाव – दोन मंत्रिपदं, गुलाबराव पाटील आणि गिरीष महाजन
  11. जालना – एकही मंत्रिपद नाही
  12. ठाणे – मिळालं. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  13. धुळे – एकही मंत्रिपद नाही
  14. नंदुरबार – मिळालं. विजयकुमार गावित
  15. नांदेड – एकही मंत्रिपद नाही
  16. नागपूर – मिळालं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  17. नाशिक – मिळालं, दादा भुसे, मालेगाव
  18. परभणी – एकही मंत्रिपद नाही
  19. पालघर – एकही मंत्रिपद नाही
  20. पुणे – मिळालं, चंद्रकांत पाटील
  21. बीड – एकही मंत्रिपद नाही
  22. बुलडाणा – एकही मंत्रिपद नाही
  23. भंडारा – एकही मंत्रिपद नाही
  24. मुंबई उपनगर- एकही मंत्रिपद नाही
  25. मुंबई शहर- मिळालं. मंगलप्रभात लोढा
  26. यवतमाळ – मिळालं, संजय राठोड
  27. रत्नागिरी – मिळालं, उदय सामंत
  28. रायगड – एकही मंत्रिपद नाही
  29. लातूर – एकही मंत्रिपद नाही
  30. वर्धा – एकही मंत्रिपद नाही
  31. वाशिम –  एकही मंत्रिपद नाही
  32. सांगली – एकही मंत्रिपद नाही
  33. सातारा – मिळालं, शंभूराज देसाई
  34. सिंधुदुर्ग – मिळालं, दीपक केसरकर
  35. सोलापूर – एकही मंत्रिपद नाही
  36. हिंगोली – एकही मंत्रिपद नाही

भाजपकडून कुणाकुणाला मंत्रिपदी संधी?

  1. चंद्रकांत पाटील – पुणे
  2. सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
  3. गिरीष महाजन – जामनेर, जळगाव
  4. सुरेश खाडे – सांगली
  5. राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी, अहमदनगर
  6. रविंद्र चव्हाण, डोंबिवली
  7. मंगल प्रभात लोढा – मुंबई
  8. विजयकुमार गावित – नंदुरबार
  9. अतुल सावे – औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद

शिंदे गटामधील कुणाकुणाला मंत्रिपद?

  1. दादा भुसे – मालेगाव, नाशिक
  2. शंभुराजे देसाई – पाटण, सातारा
  3. संदीपान भुमरे – पैठण, औरंगाबाद
  4. उदय सामंत – रत्नागिरी
  5. तानाजी सावंत – उस्मानाबाद
  6. दीपक केसरकर – सावंतवाडी, सिंधुदुर्ग
  7. गुलाबराव पाटील – जळगाव
  8. संजय राठोड – यवतमाळ
  9. अब्दुल सत्तार – सिल्लोड , औरंगाबाद