AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी कर्जमाफी, दहा रुपयांत थाळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा

महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेव्यतिरिक्त उद्धव ठाकरेंनी 10 महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा (Uddhav Thackeray big announcement winter session) केल्या. 

शेतकरी कर्जमाफी, दहा रुपयांत थाळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
| Updated on: Dec 21, 2019 | 11:54 PM
Share

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी घोषणा (Uddhav Thackeray big announcement winter session) केली. राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ (farm loan waiver Maharashtra) करण्यात येणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेव्यतिरिक्त उद्धव ठाकरेंनी 10 महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा (Uddhav Thackeray big announcement winter session) केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या 10 मोठ्या घोषणा

1) महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार.

2) गोरगरीबांना 10 रुपयांमध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. ही योजना प्रायोगिक तत्वावर 50 ठिकाणी सुरु होणार आहे.

3) पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा.

4) समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार पैसा देणार. कर्जाच्या व्याजापोटी सरकारला पैसे द्यावे लागत होते. महामार्गासाठी राज्य सरकारच पैसा उभारणार असून यामुळे व्याजापोटी जाणारे अडीच हजार कोटी रुपये वाचणार.

5) समृद्धी महामार्गालगतच्या विकास प्रकल्पातून पाच लाख रोजगार निर्माण करणार.

6) यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 253 कोटी रुपये देणार

7) कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करु

8) सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही

9) आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद

10) मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही.

संबंधित बातम्या : 

उद्धव ठाकरेंकडून कर्जमाफीची घोषणा, आदित्य ठाकरे म्हणतात…

ना फॉर्म भरण्याची अट, ना रांगेत उभे राहण्याची कटकट, कर्जमाफीसाठी फक्त एकच अट

मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात, देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफीवर टीका

नव्या कर्जमाफीसाठी कोण पात्र? कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी काय?

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...