नव्या कर्जमाफीसाठी कोण पात्र? कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी काय?

राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ (farm loan waiver Maharashtra) करण्यात येणार आहे.

नव्या कर्जमाफीसाठी कोण पात्र? कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी काय?

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ (farm loan waiver Maharashtra) करण्यात येणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील विरोधकांनी सात-बारा कोरा करण्याची मागणी करत, सभात्याग केला. (farm loan waiver Maharashtra)

येत्या मार्च 2020 पासून ही शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासात ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

नव्या कर्जमाफीसाठी कोण पात्र? कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी काय?

 • राज्यातील छोटे- मोठे सर्व शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र आहेत
 • ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज घेतलं आहे, ते सर्व शेतकरी पात्र
 • ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज म्हणून कर्ज घेतलं आहे, त्यांचं कर्ज माफ होईल
 • ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाखापेक्षा जास्त असेल, त्यांचं दोन लाखापर्यंतचंच कर्ज माफ होईल.
 • शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी मिळेल
 • कर्जमाफीसाठी कोणालाही फॉर्म भरायची गरज नाही.
 • शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील
 • आधार लिंक असलेल्या खात्यात थेट कर्जमाफी मिळणार
 • मार्च 2020 पासून महात्मा फुले कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरु
 • मंत्री, आमदार, शासकीय कर्मचारी सोडून सर्वांना कर्जमाफी मिळणार
 • जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पात्र असणार

 अर्थमंत्री जयंत पाटील यांचं ट्वीट

“आज आम्ही शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करत आहोत. कोणालाही फॉर्म भरायची, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीककर्जाबद्दल आम्ही ही भूमिका घेतली आहे.

या ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र विकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही मोठे पाऊल टाकले आहे, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं.

मुख्यमंत्र्यांची घोषणा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा केली. यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा न केल्याचा निषेध करत सभात्याग केला.

कर्जमाफीची तयारी

शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वीरितीने पार पाडण्यासाठी आजपासून पुढच्या दोन महिन्यात सर्व बँका, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पार पाडले जाईल. तसेच, योजनेच्या ठळक वैशिष्ट्यांची गाव पातळीवर प्रसिद्धी करून कर्ज खात्यांची माहिती गोळा करण्यात येईल. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभाबद्दल सविस्तर माहिती वेळोवेळी गावपातळीवर देण्यात येईल. दोन लाखापर्यंत पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी जेवढी रक्कम लागेल तेवढया रक्कमेची अर्थसंकल्पीय तरतूद शासन करणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीमुळे सर्व लाभार्थी शेतकरी सन 2020-21 पीक हंगामासाठी नव्याने कर्ज घेण्यास पात्र होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन

ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांनासुध्दा प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत योजना लवकर जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी हे एक मोठे आव्हान आहे. राज्याची वित्तीय स्थिती चांगली असो अथवा नाजूक असो, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही योग्य ते निर्णय घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 

उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या विश्वासघात केला, शेतकऱ्यांना आता तातडीची मदत अपेक्षित होती, अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे, उद्धव ठाकरेंनी 25 हजार हेक्टरीची मागणी केली होती, पण अद्याप एक पैसाही शेतकऱ्याला दिलेला नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ठाकरे सरकारने सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र 2 लाख रुपये कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. ही कर्जमाफी मार्च महिन्यात दिली जाणार आहे. मात्र 2 लाखात शेतकऱ्याचा सात बारा कोरा होतो का? चिंता मुक्त होतो का? असे सवाल देवेंद्र फडणवीसांनी केली. 

सरसकट कर्जमाफीवरुन मुख्यमंत्र्यांची पलटी, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, त्यांनी कर्ज घेतलं असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही – देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या  

शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्जमाफ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *