फडणवीसांचा पाहणी दौरा आणि पंकजा मुंडे अचानक ‘अनवेल’, राजकीय चर्चेला तोंड फुटलं

| Updated on: Oct 01, 2021 | 7:03 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्याची घोषणा केलीय. फडणवीस हे वाशिम जिल्ह्यातून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात मराठवाड्याचाही समावेश असेल. अशावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आजारी आहेत. पंकजा यांनी स्वत: याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे.

फडणवीसांचा पाहणी दौरा आणि पंकजा मुंडे अचानक अनवेल, राजकीय चर्चेला तोंड फुटलं
देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे
Follow us on

मुंबई : संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील अन्य काही भागात पावसानं थैमान घातलं. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं आणि जमिनीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदील बनलाय. अशावेळी राज्य सरकारनं तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांसह विरोधी पक्षातील नेते करत आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्याची घोषणा केलीय. फडणवीस हे वाशिम जिल्ह्यातून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात मराठवाड्याचाही समावेश असेल. अशावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आजारी आहेत. पंकजा यांनी स्वत: याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. फडणवीसांकडून दौऱ्याची घोषणा आणि पंकजा मुंडे आजारी पडणं यामुळे आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. (Devendra Fadnavis announces inspection tour of flood affected areas, Pankaja Munde is ill)

विधानसभा निवडणुकीपासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान ही बाब पुन्हा एकदा प्रकर्षानं दिसून आली. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार असल्याची घोषणा केली आहे. वाशिममधून आपण तीन दिवसीय पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

फडणवीसांकडून पाहणी दौऱ्याची घोषणा

मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर स्थानिक प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्यावेळी केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची पूर्तता झाली नाही. कागदावरच घोषणा राहिल्या. ही वास्तविकता आहे. आमच्या सरकारने जो जीआर काढला होता. तशीच मदत देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण ती मदतही त्यांनी अद्याप दिलेली नाही, असंही ते म्हणाले.

पंकजा मुंडेंची तब्येत बिघडली

दरम्यान, पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या घशात फोड आले असून त्यांना डॉक्टरांनी आगामी चार दिवस बोलणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुंडे यांना घशामध्ये फोड तसेच टॉन्सिल्सचाही त्रास सुरु झाला आहे. आगामी चार दिवसांत पंकजा मुंडे कोणालाही भेटणार नाहीत. तसेच त्या कोणाचेही कॉल स्वीकारणार नाहीत. ट्विट करत पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.

इतर बातम्या : 

‘छगन भुजबळ हे आधुनिक युगाचे भगीरथ’, जयंत पाटलांचे गौरवोद्गार

‘मंत्री टीव्हीवर घोषणा करतात, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खडकू मिळत नाही’, फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis announces inspection tour of flood affected areas, Pankaja Munde is ill