Special Report : सत्तारांची शिवराळ भाषा, महाराष्ट्राचे नेते आणि अपशब्दांची श्वेतपत्रिका

विरोधकांकडून अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जातेय. दरम्यान, अपशब्दांवरुन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक अनोखा पर्याय सुचवला आहे.

Special Report : सत्तारांची शिवराळ भाषा, महाराष्ट्राचे नेते आणि अपशब्दांची श्वेतपत्रिका
| Updated on: Nov 08, 2022 | 11:20 PM

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवराळ भाषा वापरल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जातेय. दरम्यान, अपशब्दांवरुन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक अनोखा पर्याय सुचवला आहे. जर अपशब्दामुळे राजीनाम्याची मागणी होत असेल तर मागच्या अडीच वर्षात ज्यांनी ज्यांनी अपशब्द काढले आहेत त्यांची श्वेतपत्रिका काढून त्यांचाही राजीनामा घ्यायचा का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय.