Nitesh Rane: महायुतीत मातोश्री प्रेमी तर नाही ना? नितेश राणे यांच्या आरोपांनी खळबळ, मोठा गौप्यस्फोट काय?

Nitesh Rane: राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीतील अपयशानंतर भाजपने थेट शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधत पराभवाचे खापर फोडले. या वादावर मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Nitesh Rane: महायुतीत मातोश्री प्रेमी तर नाही ना? नितेश राणे यांच्या आरोपांनी खळबळ, मोठा गौप्यस्फोट काय?
Nitesh Rane
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 1:04 PM

नुकताच राज्यात विधानपरिषदेतील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या पाचही जागांपैकी एका जागेवर भाजप, दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गट, एका जागेवर काँग्रेस आणि एका जागेवर शिवसेनेचा विजय झाला. निवडणुकीतील या अपयशानंतर भाजपने थेट शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधत पराभवाचे खापर फोडले. आता या संपूर्ण वादावार भाजप मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

नितेश राणे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचे प्रमूख म्हणून एकनाथ शिंदे आहेत. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, सुनेत्राताई पवार आहेत हे सगळी नेते मंडळी बसून या सगळ्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत ना त्यावर ते बरोबर जिथे जिथे टाइट करायचे आहे त्या सगळ्या गोष्टी आता होतील.

Loading...

भाजपने वसुलीकर उमेदवार दिला होता या शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकरांच्या टीकेला नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आता थोडं तपासायला पाहिजे की हे उद्धव ठाकरेंचे मातोश्री प्रेमी काही महायुतीमध्ये तरी राहिले नाहीत ना? त्यांचं आजही मातोश्रीवरचं प्रेम गेलेलं नाही. अशा काही लोकांना चेक करायला पाहिजे. असे शकुनीमामा महायुतीमध्ये तरी बसलेले नाहीत ना? ते नुसत्या काड्या लावतायेत. उद्धव ठाकरेला गुदगुद्या होतील, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे लोक सुखाने झोपतील यासाठी तर काही लोक महायुतीमध्ये काम तर करत नाही ना? अशा पद्धतीचे वक्तव्य आहेत. हे जरा आता तपासण्याची वेळ आलेली आहे.

नितेश राणेंनी संजय राऊतांना सुनावलं

पुढे ते म्हणाले की, संजय राऊत यांना सांगा की तू तुझ्या मालकाला तरी विचार तीन उमेदवारांचं काय झालं? त्याच्या बद्दल तू जरा बोल. आमच्या पक्षाचं आम्ही बघून घेऊ. नेहमी दुसऱ्यांच्या घरात काय चाललं आहे? ही घाणेरडी सवय, हे असले आंबट शौकीन लोक असतात म्हणून त्यांना सांगेन स्वत:च्या उबाटाचे ते तीन उमेदवार उभे केले होते त्यांना नेमकं किती मतदान मिळालं? याबद्दल महाराष्ट्राला मार्गदर्शन कर. आम्ही आमचं बघून घेऊ. भारतीय जनता पाक्ष म्हणून. त्याच्यासाठी तुझ्या सारख्या तीनपाटचा आमच्या सारख्या लोकांना मार्गदर्शनाची गरज नाही. ज्याच्या स्वत:च्या पक्षाची लायकी राहिलेली नाही. या पूर्ण ह्याच्यामध्ये उबाटा आम्हाला कुठेही दिसत नाही. काँग्रेस आम्हाला कुठेही दिसत नाही. काँग्रेसला आता एका अपक्षाचा आधार घ्यावा लागतो जल्लोष करायला. एका काळात साठ-साठ वर्षे राज्य करणारी काँग्रेस आता त्या कराळे गुरुजींच्या वर तुम्ही जल्लोषाचे पेढे वाटत असाल ना तर तुमच्या राहुल गांधी आणि महाराष्ट्राच्या नेतृत्त्वाची काय लायकी आहे?हे राज्याच्या जनतेने पाहिले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us