नाशिक दुर्घटनेची जबाबदारी भाजपनं घ्यावी, महापौर आणि भाजपचे 3 आमदार फरार झाले काय? काँग्रेसचा सवाल

| Updated on: Apr 21, 2021 | 5:25 PM

नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केलीय.

नाशिक दुर्घटनेची जबाबदारी भाजपनं घ्यावी, महापौर आणि भाजपचे 3 आमदार फरार झाले काय? काँग्रेसचा सवाल
नाशिक दुर्घटनेनंतर सचिन सावंत यांची भाजप नेत्यांवर टीका
Follow us on

नाशिक : नाशिकमधील झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीत मोठी गळती झाली आणि ऑक्सिजन पुरवठ्या अभावी रुग्णालयातील 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडालीय. अशावेळी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केलीय. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केलीय. (BJP should accept responsibility for Nashik oxygen leak tragedy-Sachin Sawant)

‘भाजपचे महापौर, 3 आमदार फरार झाले काय?’

‘झाकिर हुसेन रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी आम्ही करतो. या घटनेला जबाबदार असलेल्यांना अटक करायला हवं. हे रुग्णालय नाशिक महापालिकेचं आहे आणि महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजपने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. महापौर आणि भाजपचे 3 आमदार कुठे आहेत? ते फरार झाले काय?’ असा सवाल सचिन सावंत यांनी विचारलाय.

‘भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का?’

या दुर्घटनेची चौकशी राज्य सरकारने करावी अशी आमची मागणी आहे. दरम्यान, भाजप नेते मात्र राज्य सरकारला जबाबदार धरत आहेत. पण नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्या ऑक्सिजन टाकीचं काम नुकतंच करण्यात आलं होतं. ते कामाचं टेंडर महापालिकेनंच काढलं. तसंच ऑक्सिजन पुरवठा करण्याचं टेंडर महापालिकेनंच दिलं. अशावेळी सरकार कसं जबाबदार असेल? मग आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का? अशी शंका मनात येत असल्याची टीकाही सावंत यांनी केलीय.

आयुक्तांवर कारवाईची दरेकरांची मागणी

प्रविण दरेकर म्हणाले, “नाशिकमध्ये घडलेली घटना ह्रद्य हेलावणारी आणि व्यथित करणारी आहे. या घटनेत स्वाभाविकपणे हलगर्जीपणा सरकारचाच आहे. महापालिका असो की जिल्हा ते सरकारच्या नियंत्रणात काम करत असते. या साथीरोगात महापालिका क्षेत्रात आयुक्तांना अधिकार आहेत. त्यामुळे ही जबाबदारी आयुक्तांची आहे. कारण अशाकाळात महापालिकांना किंवा जिल्हा परिषदांना अधिकार नसतात. आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असतात. या खात्याचं नियंत्रण करणारी लोकं आणि सरकार यांची ही जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांचं आणि सरकारचं नियोजनच राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर असतं. म्हणूनच याला सरकार जबाबदार आहे आणि आयुक्त दोषी आहेत.”

संबंधित बातम्या :

Nashik Oxygen Leak Video: अर्धा तास पहिले ऑक्सिजन संपला, फडफड करुन मम्मी मेली, नाशिकच्या ‘त्या’ मुलीचा आक्रोश

Nashik Oxygen Leak : नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न!,मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

BJP should accept responsibility for Nashik oxygen leak tragedy-Sachin Sawant